नागाव 

कोरोनाच्या धास्तीने यावर्षी श्रावणात कुठलेही सण,उत्सव साजरे होत नाहीत.अगदी परंपरा जोपासण्यासाठी हे सण साजरे होत आहेत.तसाच आता दहीहंडीचा सोहळाही असाच सुनासुना वातावरणात पार पडणार आहे.बाजारात विविध आकर्षती हंड्या दाखल झाल्यात खर्‍या,मात्र त्या खरेदीसाठी गोविंदाच येत नसल्याने छोट्या व्यावसायिकांवर संक्रांत आली आहे.

 गोविंदा दोन दिवसांवर आल्यामुळे बाजारात विविध रंगाच्या, आकाराच्या हंड्या विक्रीसाठी आल्या आहेत. हंडी आणि शिगं हे  घेण्यासाठी मात्र अजून  गोविंदा पथकांची पावलं दुकानाकडे वाळलेली  नाहीत . त्यामुळे 50 टक्के तरी धंदा यावेळी होईल की  नाही अशी चिंता  व्यावसायिकांना . कोरोनामुळे पहिल्यांदाच श्रावणातील हा सण सध्याच पध्दतीने साजरा केला जाणार असल्याचे  चित्र सगळी कडे दिसत आहे .

   सध्या बाजारात 40  रूपयांपासून ते अगदी 350 रूपयांपेक्षा अधिक किंमतीच्या हंड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रस्त्याच्या कडेल किंवा दुकानांच्या बाहेर बसून या हंड्या विक्रीसाठी ठेवलेल्या दिसत आहेत. कृष्णजन्म झाल्यावर रात्री बारा वाजता काही ठिकाणी हंडी बांधून ती बालगोपाळांकडून फोडून घेतात. परंतु जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी गोपाळकाला रंगतो. या हंड्या अगदी पाच फुटापासून 15 फुटांपर्यंत उंच बांधल्या जातात. परंतु यावेळी करोणा मुळे एक तरी थर लावता येईल का अशी शंका उपस्थित झालील आहे .

 

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन