कोर्लई 

3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रिवादळानंतर महिना उलटूनही बी.एस.एन.एल.ची मुरूडमधील सेवा अद्याप ठप्प असल्याने भ्रमणध्वनी इंटरनेट सुविधा अभावी शासकीय कार्यालयातील कामे रखडलेली असून संबंधित अधिकारी वर्गाने यात लक्ष पुरवून तातडीने सेवा पुर्ववत उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुका संघटन सरचिटणीस प्रवीण बैकर यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रिवाळामुळे भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या शहरातील कार्यालयाची पार दुरावस्था झालेली असून भयंकर हानी झाली आहे. याबरोबरच तालुक्यातील आगरदांडा, नांदगाव, काशीद, बोर्ली-मांडला, साळाव व चोरढे विभागाचेही नुकसान झाले आहे. त्यातच सद्यस्थितीत मुरुडमध्ये एक लाईनमन व एक अन्य कामगार वगळता अपुर्‍या कर्मचारी वर्गामुळे कामे करण्यात डोकेदुखी होऊन बसली असल्याचे समजते. याकरिता भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या वरीष्ठ अधिकारीवर्गाने यात जातीने लक्ष पुरवून भ्रमणध्वनी इंटरनेट सुविधा पूर्ववत उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी प्रवीण बैकर यांनी केली आहे.

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....