म्हसळा तालुक्यातील जानसई नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या बदर अब्दल्ला हलदे (वय23) या तरुणाचा मृतदेह आज तिसर्‍या दिवशी पाभरे निगडी येथे सापडला आहे.नदीत पोहायला गेला असताना तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला होता.

मुसळधार पावसामुळे तालुक्यातील म्हसळा-पाभरे रस्त्यावरील जानसई नदी तुडुंब भरून वाहत होती.5 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाभरे फाटा पूल येथील जानसई नदीच्या पात्रात बदर हलदे (रा.दिघी रोड, म्हसळा) त्याच्या मित्रांसोबत पोहायला गेला होता.पुलावरून चार-पाच मुलांनी नदीत पोहण्यासाठी उड्या मारल्या.बदरनेही उडी मारली,मात्र खळवळलेल्या जानसई नदीच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने,तो प्रवाहासोबत वाहून गेला.तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता.शुक्रवारी सकाळी बदरचा मृतदेह घटनास्थळावरून साधारण 5 किमी अंतरावर पाभरे निगडी येथे आढळून आला आहे.सदरचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून,पुढील कार्यवाही सुरू आहे.

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही