Monday, March 08, 2021 | 08:04 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

बीएमसीटीपीएलच्या जुलमी राजवटीविरुद्ध आंदोलन
रायगड
20-Jan-2021 07:17 PM

रायगड

। उरण ।  वार्ताहर । 

जेएनपीटीबंदरांतर्गत सिंगापूर सरकारच्या माध्यमातून बीएमसीटीपीएल बंदराची उभारणी केली आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्त व कामगारांना कंपनी प्रशासनाने डावलून परप्रांतियांना नोकरीत सामावून घेतल आहे. या अन्यायकारक वागणुकीचा मुजोर कंपनी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी बुधवारी कंपनीविरोधात आंदोलन करुन हल्लाबोल करण्यात आला.

बीएमसीटीपीएल बंदारामध्ये स्थानिकांना रोजगार मिळवण्यासाठी सुरुवातीपासूनच लढा व संघर्ष करावा लागला होता. सुरुवातीपासूनच स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून येथे परप्रांतीय लोकांना रोजगार मिळाला आहे. काही स्थानिक युवकांना रोजगार देण्यात आला आहे.मात्र,बीएमसीटीपीएलचे व्यवस्थापन आपली मुजोरी करीत असल्याची बाबा लक्षात येत आहे. 

बीएमसीटीपीएलच्या व्यवस्थापनाने सुमारे दीडशे सुरक्षा रक्षकांना तकडाफडकी कामावर काढले आहे. ड्रायव्हर्सचे करार घेऊनसुद्धा करार मोडण्याचे काम व्यवस्थापनाने केले आहे. त्यात भर म्हणून जमिनी संपादन केलेल्या प्रकल्पग्रस्तांमधील काही कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. या विषयाची गंभीर दखल घेऊन कामगार नेते महेंद्र घरत व त्यांच्या न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या वतीने बुधवार, दि. 20 जानेवारी रोजी बीएमसीटीपीएलच्या गेटवर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्थानिक प्रकल्पग्रस्त व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी प्रशासनावर हल्लाबोल करण्यात आला.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top