खोपोली

  खोपोली मुस्लिम वेल्फेयर ट्रस्टकडून थैलेसीमिया आजाराने त्रस्त असणार्‍याअनाथ मुलांना रक्तपुरवठा करण्यात आलेला आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अतिक खोत यांनी एका पत्रकाव्दारे दिली.

   मुस्लिम वेल्फेयर ट्रस्टला मिळताच अध्यक्ष यांच्यासह सर्व सदस्यांनी पुढाकार घेत सर्वोदय हॉस्पिटल समर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि.17 ऑक्टोबर रोजी रक्ततदान शिबीर आयोजित  करून दिल्याने सामाजिक बांधिलकी जपणार्‍या ट्रस्ट सर्व स्तरातून कौतुक होत.

   खोपोली मुस्लिम वेल्फेअर ट्रस्ट सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवत असताना काही दिवसांपूर्वी कोकणात झालेल्या चक्रीवादळात घरांवरचे छपरे उडाला असताना हजारो कौलांची उपलब्ध करून दिली,अनेक गावे आंधरात असताना विद्युतपुरवठा सुरू करून दिला.तर कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा कमी पडला असता रक्तदान शिबीर आयोजित केले होते.

 मुस्लिम कम्युनिटी हॉल पंत पाटणकर चौक येथे आयोजित रक्तदान शिबीरात मुस्लिम वेल्फेयर ट्रस्टचे अध्यक्ष अतिक खोत,नगरसेवक निजामुद्दीन जळगांवकर, उद्योजक अबूशेठ जळगावकर,सेक्रेटरी अब्दुल कोरबू,खजांची इल्यास मनियार,ब्लड कॅम्प कॉर्डिनेटर जेरान नूर,रेहान नूर यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थितीत होते. तर