Wednesday, December 02, 2020 | 11:56 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

गर्भातील बाळाला दिले रक्त
रायगड
28-Oct-2020 07:44 PM

रायगड

 नवी मुंबई  

खारघर येथील मदरहुड हॉस्पीटलमध्ये आरएच निगेटिव्ह मातेने दुसर्‍या प्रसूतीमध्ये एका निरोगी बाळाला जन्म दिला असून एक दुर्मीळ गर्भधारणा यशस्वीरित्या पार पडली. वैद्यकीय क्षेत्रात, आरएच नकारात्मक महिलांची दुसरी प्रसूती अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. अशा प्रसूतींमध्ये बहुतेक वेळा असे दिसून येते की बाळ मरण पावण्याची खूप शक्यता असते, अशी मुले अशक्तपणामुळे गर्भाशयातच मृत्यूमुखी पडतात. मुख्य म्हणणे या प्रसूतीत आईच्या गर्भातच बाळाला रक्त चढवून जीवनदान देण्यात आले.

मदरहुड प्रसूती गृहात हा वैद्यकीय चमत्कार घडला. प्रसूती झालेल्या बाळाची आई ही आरएच निगेटिव्ह असून बाळाचे वडील आरएच पॉझिटिव्ह होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अशा घटना दुर्मीळ असून त्यांचे दहा हजारांमध्ये एक असे त्याचे प्रमाण आहे. ही गर्भवती माता जेव्हा दुसर्‍यांदा गरोदर राहिली तेव्हा, अँटीबॉडीजची निर्मिती इतकी जास्त होती की ती बाळाच्या आरबीसींशी संपर्क साधू लागली. बाळाच्या जन्मापुर्वी आईचे तिमाही स्कॅन, रक्त चाचण्या आणि ड्युअल मार्कर सामान्य होते. 8 मे रोजी 20 आठवड्यांसाठीच्या गर्भवतीसाठी करण्यात आलेली कुम्ब चाचणी सकारात्मक होती आणि डीटायट्रे 1:32 होता. तिचा रक्त गट आरएच निगेटिव्ह होत. तिचा पती व पहिल्या बाळाचा रक्त गट आरएच पॉझिटिव्ह होता. ही तिची दुसरी गर्भधारणा होती. खारघरच्या मातृत्व रुग्णालयात ही क्लिष्ट समजली जाणारी प्रसूती पार पडली.

गर्भाशयातच बाळाला रक्त देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने हा वैद्यकीय चमत्कार केला. डॉक्टर म्हणाले की नवी मुंबई शहरातील ही पहिलीच घटना आहे. सध्या आई व मुल दोघेही निरोगी आहेत. महिला स्कॅनसाठी आली आणि डॉक्टरांना समजले की अँटीबॉडी तयार होण्याचे प्रमाण जास्त आहे आणि यामुळे बाळाच्या लाल रक्तपेशी नष्ट होऊ शकतात आणि बाळाला गर्भाशयात अशक्तपणा होतो. यावेळी रुग्ण 33 आठवड्यांची गर्भवती होती. बाळाला रक्त पुरविणे फार महत्वाचे होते वेळीच रक्त चढविले नसते तर कदाचित बाळाचा मृत्यू झाला असता किंवा अकाली जन्म झाला असता असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top