Wednesday, May 19, 2021 | 01:55 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सुपारी पिकाचे उत्पन्न 50 टक्क्यांवर
रायगड
02-May-2021 07:31 PM

रायगड

। नांदगाव । प्रतिनिधी ।

गतवर्षी जूनच्या प्रारंभीच आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात मुरूड तालुक्यातील हजारो बागायतदारांच्या बागेतील सुपारीची झाडे भुईसपाट झाली. त्यामुळे बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले असून यावर्षी सुपारी पिकाचे केवळ पन्नास टक्केच उत्पन्न येणार असल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.

चक्रीवादळात बागायतीतील उत्पन्न देणारी तसेच फळांनी चांगली बहरलेली झाडे मोडली.त्यामुळे यावर्षी सुपारी उत्पादनाचे प्रमाण घटले आहे. सहकार तत्वावर चालविण्यात येणार्‍या मुरुड तालुका सुपारी खरेदी व विक्री संघात एप्रिल महिन्यातपर्यंत माप घालणार्‍या बागायतदारांनी या घडीला केवळ पन्नास टक्केच सुपारीचे माप घातले आहे.पुढील महिनाभरातही फारशी सुपारी संघात येणार नाही, अशी परिस्थिती असल्याने  बागायतदारांचे खूप मोठे नुकसान केले आहे.

श्रीवर्धनी रोठा म्हणून प्रसिध्द असलेल्या मुरुड तालुक्यातील सुपारीला चांगला भाव मिळतो. सुपारी मोहरा, मोती, वत्सराज अशा उत्तम जातीची असल्याने तालुक्याबाहेरील घाऊक व्यापारीही स्थानिक बागायतदारांकडून थेट सुपारी खरेदी करतात. तर सुमारे दोन हजारावर बागायतदार सुपारी संघाचे सदस्य आहेत. त्यामुळे कोट्यवधीची उलाढाल दरवर्षी सुपारी संघातर्फे केली जाते. यापूर्वी सुकलेल्या सुपारीची फोड करुन तिची निवड करुन वाशी मार्केटमधील दलालांना कमिशन देऊन सुपारीची विक्री केली जात असे.परंतु अलिकडे यात बदल करुन थेट सुरत-गुजरात येथील मार्केटमध्ये नेऊन तिची निवड न करता सरसकट विक्री केली जात असल्याने दलाली व सुपारीच्या निवडीचा खर्च वाचला. तसेच बागायतदारांना घाऊक व्यापार्‍यांपेक्षाही चांगला भाव मिळवून देण्यात संघ यशस्वी झाला. चालू वर्षी एक मण सुपारीला (20 कि.ग्रॅ.) सहा ते साडेसहा हजाराचा भाव मिळवून देऊ, मात्र कोरोनाचे संकट ओसरणे गरजेचे आहे, असे सुपारी संघाचे चेअरमन महेश भगत यांनी बोलतांना स्पष्ट केले.

चक्रीवादळात नुकसान झालेल्या बागायतदारांना राज्य शासनाने मदत जाहीर करुन तिचे वाटप एका नुकसानग्रस्त सुपारी झाडाला पन्नास रुपये तर नारळाच्या झाडाला दोनशे रुपये दर लावला गेला.

गेल्यावर्षी मुरुडच्या सुपारी संघात 725 खंडी (1 खंडी=400कि.ग्रॅ.) असोली सुपारी जमा झाली होती. यावर्षीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना पन्नास टक्केही सुपारी जमा झालेली नाही. उपलब्ध सुपारीला चांगला भाव मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. - महेश भगत, 

अध्यक्ष मुरुड तालुका सुपारी खरेदी व विक्री संघ

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top