Friday, March 05, 2021 | 07:08 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सावधान! कोरोना वाढतोय!
रायगड
22-Feb-2021 08:48 PM

रायगड

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच रायगड जिह्यात देखील रुग्णांची संख्या वाढताना दिसत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी जिल्ह्यात 85 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 147 जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. तथापि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्क्यांवर आहे तर मृत्यू दर देखील 2.68 टक्के इतका कमी आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात देखील तुर्तास लॉकडाऊन लागू होणार नसला तरी नागरिकांनी नियम पाळले नाही तर मात्र कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत शासनाकडून दिले जात आहेत.

कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन उठविल्यानंतर नागरिक मोठया प्रमाणावर नियमांचे उल्लंघन करुन लागले आहेत. पर्यटकांची देखील गर्दी मोठया प्रमाणावर वाढत आहे. पर्यटनस्थळ असणार्‍या रायगड जिल्ह्याची अर्थव्यवस्था मोठया प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून असली तरी नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. मात्र सर्वच नियम पायदळी तुडवले जात असल्याचेच निदर्शनास येत आहेत. मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग आदी नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. इतर सर्व कार्यक्रमांना देखील मोठी गर्दी होताना दिसते. या सार्‍यामुळे कोरोना वाढीचा धोका दिसून येतो. गेल्या काही दिवसांत दिवसभरात आढळणारी रुग्णसंख्या 40 हून कमी झाली होती. मात्र काही दिवसांपासून त्यात वाढ होताना दिसत आहे. आठवडाभरापूर्वी 63 असणारी रुग्णसंख्या आज 85 वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे जर नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर मात्र शासनाला पुन्हा एकदा कडक निर्बंधांचा मार्ग अवलंबण्यास वेळ लागणार नाही.

सोमवारी आढळलेल्या 85 रुग्णांमध्ये पनवेल मनपा 54, पनवेल ग्रामीण 12, उरण2, खालापूर 1, कर्जत 1, पेण 9, अलिबाग3, माणगाव 1, रोहा 2 अशी नोंद झाली आहे. मुरुड, तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर या तालुक्यांमध्ये एकाही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. तर बर्‍या झालेल्या 84 रुग्णांमध्ये पनवेल ग्रामीण पनवेल मनपा 44, पनवेल ग्रामीण 28, उरण 2, पेण 4, अलिबाग 4, रोहा 2 असा समावेश आहे. उपचारादरम्यान पनवेल मनपा आणि रोह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याच नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 3 लाख 4 हजार 88 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 40 हजार 582 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 63 हजार 359 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी उपचारानंतर 60 हजार 885 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तसेय 1 हजार 703 जणांचा उपचाारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 771 जणांवर उपचार सुरु आहेत. तसेच 147 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top