Thursday, January 21, 2021 | 12:43 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

रस्त्यासाठी नवगावकरांची ससेहोलपट
रायगड
01-Dec-2020 08:57 PM

रायगड

अलिबाग  

तालुक्यातील नवगाव येथील नवेदर नवगाव फाटा ते नवगाव पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून आरसीएफच्या ताब्यात असलेल्या या रस्त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या आरसीएफच्या टोलवाटोलवीमुळे नवगाव मधील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अनेक पत्रव्यवहार करुनही काहीच सुधारणा केली जात नसल्याने संतप्त ग्रामस्थ आंदोलनात्मक पवित्रा घेण्याची शक्यता नाकरता येत नाही.

कवडीमोल किंमतीत नवगावमधील स्थानिकांच्या जमिनी संपादन केल्यानंतर त्यांना रोजगार, तसेच त्याठिकाणी नागरी सुविधा पुरविणे आरसीएफ प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र आरसीएफ कंपनी प्रशासनाने स्थानिकांना फक्त वार्‍यावरच सोडले असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. याबाबत स्थानिकांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला; मात्र आश्‍वासनावर बोलवण करुन तोंडाला पाने पुसण्याचाच प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षात अन्य सुविधा नसल्या तरी किमान नवगावचा रस्ता तरी कंपनीने करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार रस्त्याचे नुतनीकरण व त्याची डागडुजी करण्याची संपुर्ण जबाबदारी आरसीएफ प्रशासनाची आहे. मात्र कंपनीने या जबाबदारीतूनही हात वर करीत जिल्हा परिषदेकडे बोट दाखवले आहे.

गेल्या दोन तीन वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्यामुळे नवेदर नवगाव फाटा ते नवगाव रस्ता पुर्णपणे नादुरुस्त झाला असून पडलेल्या मोठमोठया खड्डयांमुळे रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता असा प्रश्‍न ग्रामस्थांना नेहमीच पडत असतो. या रस्त्याच्या दुरुस्तीचे जबाबदारी आरसीएफ कंपनी व्यवस्थापनाची असतानाही गेल्या दोन तीन वर्षात याकडे ढुंकूनही कंपनी व्यवस्थापनाने पाहिलेले नाही. त्यामुळे अक्षरशः उखडलेल्या या रस्त्यावर एखादा अपघात होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. तसेच रस्त्याच्यादुतर्फा साईडपट्टी सफाई न केल्यामुळे असलेल्या रस्ताही अरुंद झालेला आहे. त्यामुळे या रस्त्याची रुंदीही वाढवुन मातीचा भराव करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अनेकदा ग्रामस्थामार्फत या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करुनही त्याकडे आरसीएफ कंपनी प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे. ग्रामस्थांच्या मुलभूत गरजेच्या या प्रश्‍नाकडे तातडीने लक्ष घालून हा रस्त्या दुरुस्त करावा.

पी डी कटोर

सदस्य शेकाप अलिबाग तालुका चिटणीस मंडळ

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top