म्हसळा  

 देशभरात राबविण्यात येत असलेल्या   पोषण महिना अभियानात   म्हसळा येथे बालविकास प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील दुर्गवाडी अंगणवाडी मध्ये कुपोषण, सुपोषण,बालसंगोपन,बालसंरक्षणासह आरोग्य शिक्षण देत जनजागृती करत आहेत.

 केंद्र सरकारच्या महिला बालविकास विभागाचा वतीने राबविण्यात येणार्‍या चाइल्ड लाईन 1098 या प्रकल्पाची जिल्हा समन्वय संस्था दिशा असून या प्रकल्पाच्या वतीने म्हसळा तालुक्यातील दुर्गवाडी अंगणवाडी मध्ये जागृती केली जात आहे.

 याबाबत पोस्टर प्रदर्शन,गीत गायन,व गाव बैठका मधून  जनजागृती केली गेली. 30 सप्टेंबर पर्यंत नियमितपणे या मोहिमेच्या माध्यमातून लोकशिक्षण केले जाणार आहे अशी माहिती सुपरवायझर कळबसकर   तसेच अंगणवाडी सेविका अमिता कर्णिक यांनी दिली.

 तसेच गावातील महिला मंडळ यांनी पोषण आहार आणला व वेगवेगळ्या आहाराचा प्रात्यक्षिक करून आणले आणि मोठया प्रमाणात आपला सहभाग नोंदविला.या जनजागृती मोहिमेमध्ये महिला मंडळ अध्यक्ष विनिका काविणकर,उपअध्यक्ष रोहिणी बांद्रे,सचिव सरिता बांद्रे,महिला मंडळ सल्लागार प्रेमा शिंदे,पल्लवी लडे,अंगणवाडी सेविका सानिका उद्धरकर,सेजल चाळके,मनाली कुडेकर,रजनी जोशी,मनस्वी जाधव,मयुरी दर्गे,सुवर्णा चव्हाण ह्या उपस्थित होत्या.

 

अवश्य वाचा