महाड 

गेल्या अनेक वर्षा पासुन आपण रायगड जिल्ह्यांतील जनतेचे प्रश्‍न समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतान अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेंत आणि म्हणुनच आपल्याला रायगडच्या जनतेने पाच वेळा निवडुन दिले आहे. आपण जर खोटे बोलत असतो तर जनतेने मला स्विकारले नसले असे सांगताना खासदार सुनिल तटकरे यांनी अलिबाग मध्ये मेडिकर कॉलेज सुरु करण्याचे कारण स्पष्ट केले.त्याच बरोबर कॉलेज बाबत अभ्यासु माणसांनी अभ्यास पुर्वक वक्तव्य करावे नाव न घेता  टोला देखिल खा.तटकरे यांनी लगावला.

कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढत असताना अत्यंत कठीण काळा मध्ये जनतेची दिशाभुल कोणीही करु नये सर्व सामान्य जनतेला खरी माहिती मिळावी या साठी खासदार सुनिल तटकरे यांनी  शनिवारी  महाडमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वा खाली कोरोनाच्या संकटांतुन मुक्त होण्यासाठी सर्वजण अतिशय चांगले काम करीत असुन प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

 रायगड जिल्ह्यांतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी जिल्ह्यांतील वैद्यकीय यंत्रण अहोरात्र काम करीत आहे.तरीही प्रत्येक नागरिकाने आपली काळजी घेत असताना इतरांची देखिल काळजी केली  तरच आपण कोरोना सारख्या महामारीच्या संकटाला सामोरे जाऊ शकतो.नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेऊ नये त्याच बरोबर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन खा.तटकरे यांनी यावेळी केले.

दि.23 मे रोजी आपल्या खासदारकीला एक वर्ष पुर्ण होत आहेंत,गेल्या एक वर्षात आरोग्य, पर्यटन, राष्ट्रीय महामार्ग, इत्यादी विकास कामांचा अहवाल प्रसिध्द केला असल्याचे सांगताना लोक सभेमध्ये केलेल्या कामांची माहिती देखिल दिली. 

 

अवश्य वाचा