Thursday, December 03, 2020 | 12:32 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

अनुकंपातत्वावरील 50 उमेदवारांच्या नियुक्ता
रायगड
28-Oct-2020 07:57 PM

रायगड

अलिबाग  

 सरकारी नोकरीकडे डोळे लावून बसलेल्या अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. प्रतिक्षा यादीवरील तब्बल 50 उमेदवारांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. रायगड जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी या नियुक्त्यांच्या फायलीवर स्वाक्षर्‍या करुन ऐन दिवाळीच्या तोंडावर उमेदवारांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे.

सरकारी नोकरभरतीला बर्‍याच कालावधीपासून ब्रेक लागला आहे. सध्या कोरोना महामारीचे संकट देशावर आहे. असे असताना सरकारी तिजोरीत खडखडाट असतानाच डॉ. पाटील यांनी हा धाडसी निर्णय घेऊन सर्वांनाचा विचार करायला लावले आहे. सरकारी सेवेत असताना ज्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना अतिशय कष्टमय जीवन जगावे लागले आहे. कठीण परिस्थितीवर मात करुन त्यांनी आपले शिक्षणही पूर्ण केले आहे. मात्र त्यांच्या अनुकंपातत्वावरील फायली वर्षानु-वर्षे गठ्ठ्यात दबल्या गेल्या होत्या. त्या आता बाहेर काढून मृतांच्या वारसाना न्याय देण्याचे काम डॉ. पाटील यांनी केल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

रायगड जिल्हा परिषदेकडे एकूण 79 अर्ज आले होते. पैकी 50 उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य सेवक पुरुष-11, ग्रामसेवक-10, परिचर-9, शिक्षक-5, पर्यवेक्षिका-3, स्त्री परिचर-3, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)-2, वरिष्ठ सहायक लिपीक-2, कनिष्ठ अभियंता बांधकाम-2, कनिष्ठ सहायक लेखा-1, कनिष्ठ अभियंता (ग्रामिण पाणी पुरवठा)-1, औषध निर्माण अधिकारी-1 यांचा समावेश आहे. वेळोवेळी निर्गमीत झालेल्या सरकारी निर्णयाच्या अधिन राहून या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवणे हे वरीष्ठ अधिकार्‍यांचे काम आहे. दिर्घ कालावधीपासून अनुकंपातत्वावरील उमेदवारांचा प्रश्‍न प्रलंबित होता. मृतांच्या वारसांना वेळेवर त्यांचा हक्क मिळणे गरजेचे होते. यासाठी निर्णय घेण्यात आला. यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे पाठबळ मिळाले.

डॉ. किरण पाटील,सीईओ,रायगड

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top