Wednesday, May 19, 2021 | 01:17 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

जिते, पोयनाड गावांना रुग्णवाहिका देणार
रायगड
04-May-2021 12:31 PM

रायगड

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून पेण तालुक्यातील जिते तसेच अलिबाग तालुक्यातील पोयनाड या दोन गावांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत योजनेतून सदर रुग्णवाहिका उलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासंदर्भातील सदर रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी पत्र आमदार जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी तथा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांना देण्यात आले आहे. त्यानुसार रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी 34 लाख रुपयांच्या निधीला तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. जिते व पोयनाड पंचायतीं हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे या रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर  या भागातील नागरिकांना वेगवान वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्‍वास आ जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आ.जयंत पाटील यांनी कोरोना साथ सुरु झाल्यापासून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून संकटात अडकलेल्यांना मदत करण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे.गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात गरीबांसाठी मोफत अन्नदानही केले.तसेच शेकापच्या माध्यमातून विविध घटकांना आवश्यक ते मदत पुरविण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top