Thursday, January 21, 2021 | 12:44 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

जिल्हा परिषदेने सुरक्षा रक्षक नियुक्तीत डावलले सुरक्षा...
रायगड
04-Dec-2020 09:01 PM

रायगड

अलिबाग

शासनाचे निर्देश धुडकावून लावीत रायगड जिल्हा परिषदेने सुरक्षा रक्षक नेमताना रायगड सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक नेमण्याऐवजी खासगी कंत्राटी रक्षक नेमल्याने जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकारी अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निुयक्तीबाबत रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने आक्षेप घेत सदर निविदा प्रक्रिया रद्द करुन आपल्याच सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकृत रक्षक नेमण्याची मागणी केली आहे.

शासकीय कार्यालयांना संस्था सुरक्षा रक्षक नेमणुका करताना महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 व योजना 2002 च्या तरतुदीनुसार शासनाने स्थापित केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे सुुरक्षा रक्षक नेमणे बंधनकारक असतानाही रायगड जिल्हा परिषदेने सुरक्षा रक्षक नेमताना निविदा सूचना काढीत त्यानुसार कंत्राटी सुरक्षा नेमले आहेत. तसेच या सुरक्षा रक्षकांना नियमानुसार किमान वेतन देतानाही त्यात काटछाट केली गेली आहे. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ हे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम व योजना 2002 अंतर्गत सुरक्षा रक्षकांचे नोकरीचे नियमन व कल्याणासाठी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ गठीत केलेले वैधानिक स्वरुपाचे मंडळ आहे.

रायगड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरिता सदर अधिनियमनुसारच्या अधिसूचना क्र. एसजीए 1595 (2854) कामगार-5 दि. 5 डिसेंबर 2002 पासून लागू केलेल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यामधील सर्व आस्थापनांनी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक नेमणे उक्त योजनेतील तरतुदी बंधनकारक आहेत. असे असतानाही जिल्हा परिषदेने आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामंध्ये कंत्राटी सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी 10 जून 2020 रोजी निविदा मागविल्या. त्यानुसार खासगी कंत्राटदाराकडून आलेल्या निविदानुसार कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नेमणूक ही करण्यात आली. या प्रक्रियेवर रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने आक्षेप घेत सदर निविदा प्रक्रिया रद्द करुन आपल्याच सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकृत रक्षक नेमण्याची मागणी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात जिल्हा परिषदेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top