अलिबाग

दिवसेंदिवस कमी जास्त होणार्‍या अलिबाग तालुक्यातील रुग्णसंख्या आढळलेल्या 27 नव्या रुग्णांमुळे आज एक हजारावर गेली आहे. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला तर 42 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. आज कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये लोणारे, विद्यानगर, अलिबाग शहर, नवेनगर-कुरुळ, वेश्‍वी, लेभी, नेहुली, गोंधळपाडा, बोडणी, पेढांबे, वरसोली कोळीवाडा, मानी, किहीम, चेंढरे, हाशिवरे, पांडवादेवी-शहाबाज येथील रुग्णांचा समावेश आहे.

अलिबाग शहरातील रामनाथ गावदेवी मंदिरासमोरील जलाराम बिल्डींगमधील 19 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील चुंबकीय वेधशाळेसमोरील सगुण हॉटेल शेजारी राहणा-या 47 वर्षीय व्यक्तीला, अलिबाग कोळीवाडा-शास्त्रीनगर येथील 28 वर्षीय महिलेला, पोस्ट ऑफीसजवळील चावडी मोहल्ला येथील 51 वर्षीय महिलेला तर अलिबाग एसटी स्टँड परिसरात राहणा-या46 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. वेश्‍वी येथे आज तीन रुग्णांची नोंद झाली आहे. वेश्‍वी येथील 53 वर्षीय, 37 वर्षीय पुरुष व वेश्‍वी संतोषी माता मंदिराजवळील 59 वर्षीय पुरुष अशा तिघांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पिंपळभाट चेंढरे येथील 49 वर्षीय व्यक्तीला, हाशिवरे येथील 35 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. लोणारे येथील 48 वर्षीय व्यक्तीला, विद्यानगरमधील सिगल रेसिडन्सी येथील 32 वर्षीय तरुणाला, कुरुळ-नवेनगर येथील 47 व्यक्तीला, लेभी येथील 44 वर्षीय महिलेला, नेहुली येथील 50 वर्षीय व्यक्तीला, गोंधळपाडा इंद्रप्रस्थ सोसायटी 34 वर्षीय तरुणाला तर गोंधळपाडा बे वूड सोसायटीतील 28 वर्षीय तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बोडणी येथील 9 वर्षांच्या मुलाला तर पेढांबे येथील 60 वर्षीय वृद्धेला आणि 20 वर्षीय तरुणीला कोरोना झाला आहे. वरसोली कोळीवाड्यात दोन रुग्ण आढळले असून, येथील 45 वर्षीय महिलेला आणि 23 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. मानी येथील 34 वर्षीय तरुणाला, किहीम साईनगर येथील 29 वर्षीय तरुणाला, वरसोली ताडआळी येथील 40 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर पांडवा देवी-शहाबाज येथील 58 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज दिवसभरात 42 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. कोरोना मुक्त झालेल्या या रुग्णांमध्ये बोडणी येथील 7, जिल्हा कारागृह-अलिबाग 8, नवेनगर-कुरुळ 1, आरसीएफ कॉलनी-कुरुळ 1, चावडी मोहल्ला पल्लवकर बिल्डींग 1, पोयनाड 1, वायशेत 1, वरसोली 2, सहाणगोठी 1, चौल भोवाळे 1, धोलपाडा 2, पेझारी बंधू चौक 1, बोरपाडा 1, खंडाळे 1, मांडवखार 3, पेढांबे 1, चेंढरे 1, चेंढरे मारुती मंदिर परिसर येथील 3, चेंढरे पाटील वाडी येथील 2, रेवस 1, मोठे शहापूर 1, ॠतुजा सोसायटी-चेंढरे 1 रुग्णाचा समावेश आहे.

दुर्दैवाने आज बोडणी येथील 65 वर्षीय वृद्धाची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली असून, या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आजअखेर अलिबाग तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 19 वर पोहोचली आहे. यापैकी 810 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 180 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार शेजाळ यांनी दिली.

अवश्य वाचा