अलिबाग,

अलिबाग तालुक्यातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वर खाली होत आहे.मंगळवारीही तालुक्यात नवे 81 रुग्ण नोंदले गेले तर चारजणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.आहे.तालुक्याची आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या 3564  अशी झाली आहे.

तालुका प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार तालुक्यात मंगळवारी नवे 81 रुग्ण दाखल झालेले आहेत.तर एकूण 818 जणांवर उपचार केले जात आहेत.विशेष म्हणजे दिवसभरात 103 जणांनी कोरोनावर मात केली.त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

दिवसभरात चौघाजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यात चौल  येथील 80 वर्षीय पुरुष,आक्षीतील 70 वर्षीय पुरुष,जिल्हा रुग्णालयातील 65 वर्षीय पुरुष आणि वाळंज,परोडा,नागाव येथील 56 वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश आहे.

तालुक्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या  3564 वर पोहोचली आहे.त्यातील 2663 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात आतापर्यंत 81 जण दगावले आहेत.

अवश्य वाचा