अलिबाग

अलिबाग तालुक्यात नव्याने नोंद झालेल्या 41 रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या तेरोशेच्या पुढे जात 1317 वर पोहोचली आहे. तसेच 21 रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त झाल्याने बरे होण्याचे प्रमाण मात्र 79.49 इतकेच कायम आहे. शहरात 8 रुग्ण आढळले असून सर्वात जास्त रुग्णांची नोंद वालवडे-शहाबाज येथे 8 जण आढळल्याने झाली आहे. चेंढरे परिसरात देखील 6 रुग्णांची नोंद झाली आहे. आरसीएफ कॉलनी, कुरुळ, बांधण, चेंढरे, वरसोली, गोंधळपाडा, आग्राव, ताडवागळे, मानी, आगरसुरे, कावाडे येथे नवीन रुग्ण आढळले आहेत.

मंगळवारी अलिबाग शहरातील हिराकोट तलावाजवळ फॉरेस्ट कॉलनीतील 38 वर्षीय इसम, श्रीबाग नं 2 येथील 31 वर्षीय स्त्री, रामनाथ येथील 25 वर्षीय तरुणी, ठिकरुळनाका येथील ओम सिद्धांत अपार्टमेंटमधील 39 वर्षीय स्त्री, चेंढरे रायवाडी कॉम्प्लेक्समधील 44 वर्षीय पुरुष, क्रीडा भवनजवळील कौस्तुभ अपार्टमेंटमधील 37 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच पोलिस वसाहतीमधील 34 व 53 वर्षीय अशा दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. वालवडे-शहाबाज येथे आढळलेल्या 7 रुग्णांमध्ये 14 वर्षीय बालक आणि 15 वर्षीय बालिकेसह 21 वर्षीय तरुणी तसेच 50 व 57 वर्षीय दोन पुरुष, 40, 46 व 60 वर्षीय तीन स्त्री या यांचा समावेश आहे. चेंढरे परिसरातील विद्यानगर येथील 37 वर्षीय, पंतनगर राजस बंगलो येथील 45 वर्षीय पुरुष, साईनगर पिंपळभाट येथील 25 वर्षीय तरुणी, चेंढरे पंचरत्न सोसायटीतील 27 वर्षीय तरुण, चेंढरे नागडोंगरी, अलिबाग सोसायटी येथील 30 वर्षीय तरुण यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कुरुळ आरसीएफ कॉलनीतील 22 वर्षीय तरुणासह 47 वर्षीय पुरुष तसेच जेएसडब्ल्यू हॉस्टेलमधील 26 वर्षीय तरुणी कोरोना संसर्गित आढळले असून कुरुळ ग्रामपंचायतीसमोर राहणार्‍या 51 वर्षीय व्यक्तीला देखील लागण झाली आहे. त्याचप्रमाणे कावाडे हाशिवरे येथील 36 वर्षीय स्त्री, कावाडे येथील 46 वर्षीय पुरुष, खिडकी येथील 53 वर्षीय स्त्री, ताडवागळे येथील 26 व 30 वर्षीय दोन तरुण, गोंधळपाडा येथील 35 वर्षीय पुरुष, इंद्रप्रस्थ सोसायटीतील 35 वर्षीय पुुरुष, थळ येथील 58 वर्षीय पुरुष, मानी येथील 23 वर्षीय तरुण व 53 वर्षीय पुरुष, धर्मा बिल्डींग वरसोली येथील 45 वर्षीय पुरुष, आगरसुरे येथील 50 वर्षीय पुुरुष, बांधण येथे 24 व 25 वर्षीय दोन तरुणी आणि 45 वर्षीय महिला असे तीन रुग्ण आढळले.

तर बरे वाटल्याने 21 रुग्णांना आज घरी कोरोनामुक्त घोषीत करण्यात आले. यात शहरातील मिरची गल्ली येथील 3, कुरुळ येथील 2, श्रीगाव येथील 3, तर पांडवादेवी, साईनगर-किहीम, वरसोली, वैभवनगर-चेंढरे, मानी, नेहूली, थळ, गोंधळपाडा, ताडआळी वरसोली, पंतनगर चेंढरे, थळपेठ, बेलपाडा आणि खिडकी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत अलिबाग तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 317 झाली असून त्यापैकी 36 जणांचा मृत्यू झाला तर 1 हजार 47 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत 234 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही