अलिबाग

 अलिबाग तालुक्यात सोमवारी आढळलेल्या कोरोनाच्या 33 नव्या रुग्णांमुळे बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 96 वर पोहोचली आहे. आज शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  दिवसभरात 21 जण कोरोना मुक्त झाल्याने

 रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 

आज कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये थळ, मानी-भुते, विद्यानगर, चेंढरे, वरसोली, वाडगांव, वावे, बोडणी, नेहुली, अलिबाग शहर, मांडवा, गोंधळपाडा, कुरुळ, मिळकतखार, शहाबाज, लोणारे, रेवस येथील रुग्णांचा समावेश आहे.

थळ येथे तीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये थळ येथील 55 वर्षीय व्यक्तीचा, तसेच थळ ग्रामपंचायत कार्यालय परिसरात राहणार्‍या 36 वर्षीय पुरुष व 61 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. मानी भुते येथील 56 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. विद्यानगर येथील 41 वर्षीय महिला व 25 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. चेंढरेतील तांबोळी हॉस्पिटलजवळील 24 वर्षीय तरुणीला कोरोना झाला आहे.

वरसोली विजय नगर येथील 41 वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. विद्यानगर येथील तेजस अपार्टमेंटमधील 43 वर्षीय व्यक्तीला, वाडगांव येथील 26 वर्षीय तरुणीला, चेंढरेतील स्वामी शक्ती बिल्डींगमधील 30 वर्षीय तरुणाला, वावे येथील 35 वर्षीय तरुणाला, बोडणी येथील 62 वर्षीय वृद्धाला, नेहुली येथील 26 वर्षीय तरुणाला तर अलिबाग मिरची गल्ली येथील 28 वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे.

अलिबाग पोलीस लाईनमधील 30 वर्षीय तरुणाला, गोंधळपाडा येथील 65 वर्षीय वृद्धाला, कुरुळ येथील 44 वर्षीय पुरुषाला, मिळकतखार येथील 53 वर्षीय पुरुषाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मांडवा येथे सहा रुग्णांची नोंद झाली असून, येथील 35 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय मुलगी, 29 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, 9 वर्षांची मुलगी आणि 33 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

आरसीएफ कॉलनी कुरुळ येथील 23 वर्षीय व 22 वर्षीय दोन तरुणांना कोरोना झाला आहे. शहाबाज येथील 19 वर्षीय तरुणाला, लोणारे येथील 42 वर्षीय महिला, 72 वर्षीय वृद्ध महिला आणि 19 वर्षीय तरुणाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तर रेवस येथील 54 वर्षीय पुरुषाला व वरसोली ताडआळी येथील 16 वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.

आज दिवसभरात 21 रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यामध्ये नवेदर नवगाव 2, बोरपाडा 1, सुभाष नगर पेझारी 1, आंबेपूर 1, विद्यानगर श्री स्वामी समर्थ सोसायटी 1, अलिबाग कोळीवाडा 1, नागांव 1, नवघर रामराज 1, अलिबाग बाजारपेठ 1, फुफादेवीपाडा 1, प्रिमियर पार्क विद्यानगर 1, नवीन कमळपाडा-पोयनाड 3, चेंढरे स्वामीधाम नगर 2, कुणे 1, वरसोली कोळीवाडा 1, इंद्रप्रस्थ सोसायटी गोंधळपाडा येथील 1 आणि तळाशेत येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, तालुक्यात आजअखेर बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 96 वर पोहोचली आहे. यापैकी 31 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 878 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 187 रुगणांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद