अलिबाग  

अलिबाग तालुक्यात शुक्रवारी कोरोना संसर्गित 21 नवे रुग्ण आढळले असतानाच 30 जण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. आतापर्यंत 1191 रुग्णांची नोंद झाली असून 954 जण कोरोना मुक्त झाले आहेत. सरासरीनुसार रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.10 टक्के इतके आहे. 

नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये चेंढरे परिसरातील कृष्णदर्शन सोसायटीतील एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात 1 वर्षाच्या बालिकेसह 36 व 60 वर्षीय स्त्री, तसेच 38 व 65 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. तर कृष्णा पॅलेस मधील  50 वर्षीय पुरुष, शिवनगर चेंढरे येथील 48 वर्षीय पुरुष, विद्यानगर देवस्व सोसायटीतील 38 वर्षीय पुरुष, रोहिदास नगर येथील 36 वर्षीय स्त्री तसेच अलिबाग शहरातील रामनाथ येथील पोलीस हेड क्वार्टरमधील 50 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. तरी अलिबाग शिवलकर नाका येथील 41 वर्षीय महिलेला व 47 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. तर वृंदावन सोसायटी-अलिबाग येथील 61 वर्षीय वृद्ध महिलेला कोरोना झाला आहे. चेंढरे येथील 55 वर्षीय महिलेचाही समावेश आहे. नागाव येथील 32 वर्षीय महिलेला तर वनवली नागाव येथील 40 वर्षीय पुरुषाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वाडगांव येथील 58 वर्षीय पुरुष आणि 54 वर्षीय महिला अशा दोघांची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आली आहे. हाशिवरेतील मोकल आळी येथील 24 वर्षीय तरुण व 29 वर्षीय तरुण अशा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

मापगाव चोरोंडे येथील हनुमान मंदिरजवळ राहणार्‍या 30 वर्षीय तरुणाला, विद्यानगर देवस्व सोसायटीतील 38 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे.

आज दिवसभरात तीस रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यामध्ये रेवस येथील 1, गुरुदत्त सोसायटी-अलिबाग 1, कनकेश्‍वर फाटा 1, चेंढरे 1, अलिबाग कोळीवाडा 1, आत्माराम नगर-चेंढरे 1, हाशिवरे 2, रेड स्टोन रिसॉर्ट-पेझारी 1, क्लीप हेवन सोसायटी-अलिबाग 1, शहाबाज 1, लोणारे 1, विद्यानगर 1, रामनाथ जलाराम बिल्डींग येथील 1, नवेनगर-कुरुळ 1, वेश्‍वी संतोषी माता मंदिरजवळील 1, लेभी 1, शास्त्रीनगर अलिबाग कोळीवाडा येथील 1, नेहुली येथील 1, इंद्रप्रस्थ सोसायटी-गोंधळपाडा 1, बोडणी 1, पेढांबे 2, वरसोली कोळीवाडा 1, मानी 1, चावडी मोहल्ला-अलिबाग 1, वेश्‍वी 2, पांडवादेवी-शहाबाज 2 रुग्णांचा समावेश आहे.

 अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 191 वर पोहोचली आहे. यापैकी 33 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 954 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 204 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही