अलिबाग,

अलिबाग तालुक्यात कोरोनाचे नवे 15 रुग्ण शनिवारी आढळून आले. यामुळे तालुक्यातील आतापर्यंतची रुग्णसंख्या आता 4,769 अशी झाली. त्यातून 4481रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आता प्रत्यक्षात 160 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. शनिवारी 19 जणांना उपचारानंतर घऱी पाठविण्यात आले. सुदैवाने कोणीही दगावले नाही. मृतांची संख्या 128 जैसे थे आहे, अशी माहिती तहसिलदार सचिन शेजाळ यांनी पत्रकाद्वारे दिली.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त