अलिबाग  

सोमवारी आढळलेल्या 14 नव्या रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 1276 वर जाऊन पोहचला आहे.  तर 26 जणांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. दुर्दैवाने उपचार सुरू असलेल्या रेवदंडा येथील वृद्ध पुरुषाचा आज मृत्यू झाला.

  नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील शिवसन सोसायटीतील 38 वर्षीय स्त्री, वरसोली आदर्शनगर येथील 40 वर्षीय स्त्री, तर 15 वर्षीय बालक, 20 वर्षीय तरुणाला संसर्ग झाला आहे. गायचोळ-चौल येथील 17 वर्षीय तरुण, 19 व 24 वर्षीय तरुणी आणि 45 वर्षीय स्त्रीचा समावेश आहे. चेंढरे पंतनगर येथील 27 वर्षीय तरुण, आत्माराम नगर येथील 67 वर्षीय वृद्ध पुरुष,  विद्यानगर नायर हाऊस येथील 75 वर्षीय वृद्ध पुरुष, थळ बाजार येथील 34 वर्षीय पुरुष, रेवदंडा आगरआळी येथील 28 वर्षीय तरुण स्त्री, पांडवादेवी पोयनाड येथील 85 वर्षीय वृद्ध पुरुष यांनादेखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

  उपचार सुरू असलेल्यांपैकी बरे होऊन कोरोना मुक्त झालेल्यांमध्ये कुरुळ येथील 1, चेंढरे परिसरातील 5,  मांडवा येथील 7, नांदेवरसोली, वाडगाव,  वावे, थळ, पांडवादेवी, आक्षी, मुनवली, रेवदंडा बाजारपेठ, थळ, शहाबाज, लोणारे 2, ताडआळी वरसोली अशा 26 रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असलेल्या रेवदंडा येथील 85 वर्षीय वृद्ध पुरुषाचा दुर्दैवाने आज मृत्यू झाला.

आतापर्यंत अलिबाग तालुक्यात व 1276 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1026 जण कोरोनामुक्त झाले असून उपचारा दरम्यान 36 जणांचा मृत्यू झाला सध्यस्थीतीत 214 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद