अलिबाग 

लॉकडावून नंतर बेरोजगारीमुळे वाढललेल्या चोरी, लुटमारी, दरोडे यासारख्या घटना टाळण्यासाठी अलिबाग पोलिसांनी व्यापारी तसेच ज्वेलर्स असोसिएशनसोबत बैठक घेत एक कॅमेरा शहरासाठी' ही अभिनव संकल्पना राबविण्याचे आवाहन केले आहे. या संकल्पनेद्वारे दुकानासोबतच परिसरसतील मुख्य रस्ता कव्हर होईल या दृष्टीने कॅमेरा बसविण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक के डी कोल्हे यांनी केले आहे.

अलिबाग पोलीस ठाण्याच्या वतीने दोन्ही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पोलीस निरीक्षक के डी कोल्हे यांनी केलेल्या आवाहनानुसार शहरात व्यापारी, ज्वेलर्स आदी दुकाने  अत्यंत गजबजीच्या ठिकाणांवर असल्याने सदरच्या ठिकाणावर दररोज अनेक अनोळखी लोकांची ये जा होत असते. तसेच अलिबाग शहरात अनेक पर्यटक हे बाहेरून फिरण्यासाठी येत असतारा तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन आपण आपल्या आस्थापणा/दुकानांवर  लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे हे आपल्या दुकानासमोरील मुख्य रस्ता पुर्णपणे कव्हर होईल अश्या पध्दतीने बसवून घ्यावेत, तसेच सायरन लावुन घ्यावेत जेणेकरून आपल्या दुकाना ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा बेकायदेशीर कृत्य घडल्यास तात्काळ हा प्रकार लक्षात येईल. त्यानुसार संबंधित  ईसमावर तात्काळ कारवाई करता येईल एक कमेरा शहरासाठी या सकल्पनेनुसार आपण एक कमेरा दुकानासमोरील रस्ता कव्हर होईल अश्या दृष्टीने लावावा त्याचा फायदा आपणास, अलिबाग शहरास व पर्यायी शासनास नक्कीच होवू शकतो म्हणून आपण लावेलेले सी सी.टी.व्ही.कॅमेरे हे मुख्य रस्ता कव्हर करतील असे पध्दतीने लवकरात लवकर लावून घ्यावे असे आवाहन करण्यात आले.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त