Wednesday, December 02, 2020 | 11:08 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

कृषीवलच्या दणक्याने जिप आरोग्य खाते जागे
रायगड
20-Nov-2020 08:45 PM

रायगड

अलिबाग 

लेप्टो स्पायरोसीसची लक्षणे असणार्‍या रुग्णांच्या मृत्यूनंतर नागाव ग्रामपंचायतीलने लक्ष वेधून देखील झोपेतच असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला कृषीवलने दणका देताच जाग आलेल्या आरोग्य विभागाच्या रेवंदडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍याने नागांव ग्राम पंचायत हद्दीतील गांवामध्ये सर्वेक्षण केले. यावेळी त्यांनी एकही रुग्ण सापडला नसल्याचा दावा केला असला तरी यापूर्वी मृत झालेल्या ग्रामस्थांबाबतचा प्रश्‍न अनुत्तरीतच राहिला आहे. दरम्यान, एवढी मोठी चर्चा होत असताना नागाव मुख्यालयाजवळ असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांनी स्वतः जाऊन भेट घेणे अपेक्षित असतानाही त्यांनी याबाबत दुर्लक्षच केले असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. तर कृषीवलच्या वृत्तानंतर आरोग्य विभागाने दखल घेतल्याने सरपंच निखील मयेकर, सदस्या हर्षदा मयेकर यांनी समाधान व्यक्त केले.

याबाबत रेवदंडा प्राथमिक आरोग्य अधिकार्‍यांच्या सहीने देण्यात आलेल्या लेखी पत्रानुसार आपल्या ग्राम पंचायत हद्दीतील काही गावांमध्ये लेप्टोस्पायरोसिस आजाराचे संशियीत रुग्ण सापडत आहेत. असे कालच्या वृत्तपत्रानुसार समजले आहे. पंरतु नागांव ग्राम पंचायत हद्दीतील गांवामध्ये सर्वेक्षण केले असता. लेप्टोस्पायरोसिस आजाराच्या लक्षणांचा एकही रुग्ण सर्वेक्षणामध्ये सापडला नाही. सध्या स्थितीत कापणीचा हंगाम असल्यामुळे दळदळ,पाळीव प्राणी यांचा सुळसुळाट, उंदिर, घुशी यांचा वावर यांमुळे लेप्टोस्पायरोसिस रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे हे गृहित धरुन आपण स्थरावर दंवडीव्दारे आरोग्य शिक्षणामध्ये गोठ्यातिल शेण फळीणे किंवा फावडयाने साफ करणे. गुरे, ढोरे घुसी, डुकर व इतर पाळीव प्राणी यांच्या मलमूत्राच्या संर्पकात येणार नाही याची दक्षता घेणेस सांगणे. शेतावर व गोठयात काम करताना गमबूट व हातमौजे याचा वापर करणे तसेच वैयक्तिक स्वच्छता व परिसर स्वच्छता या बाबत घरोघरी आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात यावी जेणे करुन जनतेचे आरोग्य अबाधित राहील असे आवाहन केले आहे.

नागावमध्ये गेल्या काही दिवसात अचानक 4-5 ग्रामस्थांचा मृत्यू झाले असून या सर्व ग्रामस्थांमध्ये लेप्टोची लक्षणे आढळून आली आहेत. त्यापैकी एकाच ग्रामस्थाची टेस्ट करण्यात आली होती. त्याचेही रिपोर्ट येण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागेल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर अन्य मृत ग्रामस्थांची टेस्ट करण्यासाठी नमुनेच उपलब्ध नसल्याने आरोग्य विभाग त्याबाबत कसा काय खुलासा करणार असा सवाल ग्रामपंचायत सदस्या हर्षदा मयेकर यांनी केला आहे. काल सायंकालपासून ज्या परिसरातल्या लक्षणे असलेल्या ग्रामस्थांचा मृत्यू झाला होता त्या परिसरात गोळ्यांचे वाटप सुरु करुन ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करण्यास देखील सुरुवात करण्यात आली असल्याचे सरपंच निखील मयेकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top