म्हसळा 

कोरोनाच्या महामारीत म्हसळा नगरपंचायतीचे कर्मचारी सचिन मोरे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारार्थ लोणेरे येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या स्वब दिनांक 3 जुलै रोजी तपासणीसाठी पाठविल्या होत्या त्याचे रिपोर्ट दिनांक 7 जुलै रोजी प्राप्त झाले आणि त्याच दिवशी त्यांना उपचारार्थ लोणेरे येथे नेण्यात आले.7 दिवसाच्या उपचारानंतर मंगळवारी कोरोनावर यशस्वी रित्या मात करून सचिन मोरे हे त्यांच्या घरी सुखरूप पोचले.

म्हसळा नगरपंचायतीतर्फे सचिन मोरे यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी  म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्री कापरे, मुख्याधिकारी मनोज उकीर्डे, दिपाली रामा मुंडये, हदय सुरेश आग्रे, चंद्रकांत कापरे, अशोक कापरे, संतोष कुडेकर, प्रशांत करडे, प्रणित बोरकर, ज्योती करडे, आदि कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्षा जयश्री कापरे यांनी नगरपंचायतीतर्फे स्वागत करताना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....