महाड 

महाडसह संपुर्ण रायगड जिल्ह्यंतील प्रख्यात फौजदारी आणि दिवाणी वकील अ‍ॅड.प्रशांत मतन साबळे यांचे सोमवारी अल्पशा आजाराने वयाच्या 56 व्या वर्षी दुख:द निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आलेल्या तपासणी अहवालामध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले.

महाडमध्ये गेले अनेक वर्षे वकिली व्यवसायामध्ये आपला वेगळा ठसा उमटवून पक्षगाराच्या मनामध्ये विश्‍वास निर्माण करणारे वकील म्हणुन अ‍ॅड.प्रशांत साबळे यांचा लौकीक होता. पंधरा दिवसा पुर्वी साबळे यांची कोरोना टेस्ट करण्ंयात आली असता त्यांचा अहवाल पॉझेटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यांतील पुना हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यांत येत होते. चार ते पाच दिवसा पुर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने चिंता व्यक्त करण्ंयात आली. सोमवारी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही. सोमवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.अ‍ॅड.साबळे यांच्या पश्‍चात पत्नी, विवाहीत मुलगी-मुलगा असा परिवार आहे. त्यांचा अंत्यसंस्कार पुणे येथेच करण्यांत आला असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.