चौल  

माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेत कुरुळ येथील आरसीएफ शाळेची विद्यार्थिनी आदिती किरण पाटील हिने 91 टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. आदिती ही अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील रहिवासी आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

शाळेतील शिक्षकांचे सर्व विषयांचे परिपूर्ण मार्गदर्शन, तसेच दररोज मन लावून अभ्यास केला, प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचा प्रयत्न केला, वर्षभराच्या मेहनतीमुळेच हे यश मिळविण्यात यशस्वी झाले, असे आदितीने सांगितले. आदितीच्या या यशाबद्दल शिक्षक, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून तिचे कौतुक करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

 

अवश्य वाचा

फरमानशेठ दफेदार यांचे निधन