कर्जत 

कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेले नियम धाब्यावर बसविणार्‍या ग्राहक व विक्रेत्यांवर कर्जत नगर परिषदेच्या अधिकार्‍यांनी दंडात्मक कारवाई केली. कर्जत बाजारपेठेत मास्क न लावता फिरणे, दुकानात गेल्यावर विक्रेते ग्राहकांना सॅनिटायझर न करणे, सोशल डिस्टनसिंग न पाळणे , टपर्‍यावरं गर्दी करणे ,आदींबाबत कडक निर्बंध मा . जिल्हाधिकारी यांनी आणले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे यासाठी दिलेले नियम पाळा , याबाबत वारंवार सूचना देऊनही नागरिक त्याचप्रमाणे विक्रेते कानाडोळा करतात. याबाबत नगरपरिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दंडात्मक  कारवाई केली .

कर्जत तालुक्यातील तसेच शहरातील कोरोनाची संख्या पाहता दि.29, 30 जून व 1 जुलै रोजी अश्या तीन दिवस कर्जत बाजार पेठ बंद ठेवण्यात आली होती. मात्र आज हर6लमात्र तीन दिवसा नंतर बाजारपेठमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यावेळी अनेकजण नियमांचे पालन करत नव्हते. ही बाब कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या लक्षात आली आणि त्यांनी कर्मचार्‍यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे काल दि.2 जुलै रोजी कर्जत बाजारपेठेत  कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र, गोसावी, सचिन सोनावणे , नगर अभियंता मनीष गायकवाड , सहाय्यक अभियंता सारिका कुंभार , सहाय्यक. नगररचनाकार लक्ष्मण माने, सुरेश खैरे, नरेंद्र गजभिये , प्रभाकर कोचूरे, अशोक भालेराव, सुनील लाड, अरविंद नातू , स्वच्छता निरीक्षक सुदाम म्हसे,  बापू बहिरम, मुकादम प्रदीप मोरे , निलेश निकाळजे,  दिलीप गायकवाड,  अविनाश पवार आदी अधिकारी व कर्मचारी यांनी कारवाई केली.

अनेक नागरिकांवर, ग्राहक, विक्रेते यांच्यावर 500रु . दंडात्मक कारवाई करण्यात आली. काल दि. 2 जुलै रोजी 13 हजार 100 रुपये दंडात्मक वसूली करण्यात आली.आजदि 3 जुलौही व पर्यत 36 हजार 700 रुपयांची दंडाची रक्कम वसूल झाली आह दंडाची रक्कम न देणार्‍यास पोलीसाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार  आहे.

जिल्हाधिकारी यांनी सांगितलेले नियमाचे पालन  न पाळल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्जत नगर परिषदेच्या दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.. अशी माहिती  कर्जत न. प. चे मुख्याधिकारी डॉ .पंकज पाटील यांनी दिली.