नेरळ

कर्जत तालुक्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून लोकप्रतिनिधीं बरोबरच पोलीस खात्याच्या मागेही कोरोनाचा ससेमिरा सुरू आहे.  कर्जत पोलिस ठाण्यामध्ये परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षकासह नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने  एकूण रुग्णांचा आकडा 582 वर जाऊन पोहचला आहे. तर 477 रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले आहेत.

 कर्जत पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले 31 वर्षीय परिविक्षाधीन पोलीस उप निरीक्षकाचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर दहिवली येथील विठ्ठल मंदिर परिसरात राहणार्‍या एका 54 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असून ही व्यक्ती सामाजिक कार्यकर्ता आहे व विवाह संस्थाही चालविते. भिसेगाव परिसरात राहणार्‍या एका 23 वर्षीय तरुणाचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या तरुणाचे वडील मजूर ठेकेदार आहेत. कडाव गावानजीक रहात असलेल्या एका 39 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून ही व्यक्ती ठेकेदार आहे. गौळवाडी येथील एका 34 वर्षीय तरुणालाही कोरोनाची बाधा झाली आहे.

  भिसेगाव मधील एका 30 वर्षांच्या तरुणाचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून हा तरुण सर्व्हिस सेंटर चालविते. सुर्यमल्हार इमारतीत राहणार्‍या एका 50 वर्षांच्या व्यक्तीला सुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे. कर्जत मधील राज टॉवर इमारतीत राहणार्‍या एका 50 वर्षांच्या व्यक्तीला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. नेरळ जुन्या बाजारपेठेत एक चिक्की - फरसाण मार्ट चालवणार्‍या एका 41 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

 

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही