Wednesday, December 02, 2020 | 11:16 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

85 नवीन रुग्णांची जिल्ह्यात नोंद तर 80 कोरोनामुक्त
रायगड
21-Nov-2020 08:49 PM

रायगड

अलिबाग  

कोरोना रुग्णांच्या संख्येत रायगडात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असून दोन दिवसाच्या तुलनेत शनिवारी कमी 85 इतक्या रुग्णांची नोंद झाली. तर 80  रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत एकूण रुग्णंसख्या 56 हजार 071 वर पोहचली असून त्यापैकी 53 हजार 596 रुग्ण बरे झाले तर 1 हजार 593 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सद्यस्थितीत 882 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज आढळलेल्या 85 रुग्णांमध्ये पनवेल मनपा क्षेत्रात सर्वाधिक 59, पनवेल ग्रामीणमध्ये 7, कर्जत 4, पेण 4, अलिबाग 5, खालापूर, माणगाव, रोहा, सुधागड, श्रीवर्धन आणि महाड या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा समोवश आहे. सुदैवाने आज एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नाही. तर बरे झालेल्या 80 रुग्णांमध्ये पनवेल मनपा क्षेत्रामध्ये 65, पनवेल ग्रामीण 7, पेण 4 तर उरण, खालापूर, अलिबाग, सुधागड या तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा समोवश आहे. 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top