उरण  

उरण कोटनाका येथिल तू.ह.वाजेकर सभागृहात शेकापचा 73 वा वर्धापनदिन जल्लोषात साजरा करण्यात आला. उरण पंचायत समितीचे सभापती अ‍ॅड.सागर कडू यांनी तू.ह.वाजेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी वाजेकर शेठ अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.

शहर चिटणीस शेखर पाटील यांनी या वर्षी मृत्यू झालेल्या सर्वाना भावपूर्ण श्रद्धांजली ठराव घेऊन आदरांजली वाहिली. यावेळी शेकापची प्रतिज्ञा घेण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो, लाल बावटे की अशा जय घोषणा देण्यात आल्या. तसेच यावेळी सर्व कार्यकर्त्यांना आर्सेनिक अल्बम च्या गोळ्या व सॅनिटायझरचे वाटप महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा घरत यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपसभापती शुभांगी पाटील, शहराध्यक्षा नयना पाटील, भाई जीवन गावंड, भाई रमाकांत पाटील, भाई सुरेश पाटील, पिरकोन सरपंच रमाकांत जोशी, भाई रमाकांत गावंड, भाई हरेंद्र गावंड, भाई अनंत घरत, रवी पाटील आदी कार्यकर्ते  हजर होते . या कार्यक्रमाचे आभार सहचिटनिस यशवंत ठाकूर यांनी मानले.

उरण तालुक्यातील प्रत्येक गावात वर्धापनदिन साजरा करण्यात आला. कोणी आपल्या घरात तर कार्यालयात वर्धापनदिन साजरा केला. सर्व तालुका लालेमय झाला. उरण तालुक्यातील वातावरण लाल बावट्याचे झाले. कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश पहावयास मिळत होता.

अवश्य वाचा

फरमानशेठ दफेदार यांचे निधन