पाली/बेणसे  

2 ऑगस्ट रोजी मागील अनेक वर्षापासून अत्यंत उत्साहवर्धक, दिमाखदार व वैभवपूर्ण साजरा होणारा शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन यंदा कोरोनाच्या व निसर्ग चक्रीवादळाच्या पाश्‍वभूमीवर सुधागड सह जिल्ह्यात सामाजिक भान राखून  साधेपणाने साजरा करण्यात आला. सुधागड तालुक्यातील अनेक गावांत व घरांवर शेकापचा लालबावटा दिमाखात फडकताना दिसला. सुधागड पालीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शेकाप नेते सुरेशशेठ खैरे यांनी शेतकरी कामगार पक्षाची यशस्वी घौडदौड पुढे अशीच सुरू ठेवून जनमानसाच्या मनामनात यापुढेही शेकाप विषयी कायम आदरभाव व आपलेपण निर्माण होणेकामी सर्वानी अधिक झोकून देऊन जनहिताची कामे करा.  पक्ष संघटना अधिकाधिक बळकट कशी होईल यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन तनमन धनाने योगदान द्यावे असे आवाहन खैरे यांनी केले. 

सुधागडसह जिल्ह्यात शेकाप कार्यालय,  तालुक्याच्या ठिकाणी, तसेच गावागावात कार्यकर्त्यांनी शासन नियमांचे पालन करून वर्धापन दिन साजरा केला. पालीतील कार्यक्रमास  रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश शेठ खैरे, तालुका चिटणीस उत्तम देशमुख, खरेदी विक्री संघाचे किसन उमटे, पंचायत समितीच्या सदस्या सविता हंभिर, ऍड:  सुभाष पाटील, युवक अध्यक्ष अतिश सागळे, माजी चिटणीस राजाराम देशमुख, माजी सभापती भारतीताई शेळके, विठ्ठल सिंदकर, गजानन शिंदे, संजोग शेठ, सुधीर सखरले, सुमेध खैरे, श्री नागे साहेब, प्रसाद काटकर, प्रशांत नागोठाकर, हेमंत शिलीमकर, संजय हुळे, पद्माकर काटकर, डी के देशमुख, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अवश्य वाचा

फरमानशेठ दफेदार यांचे निधन