माणगाव 

शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापनदिन दरवर्षी 2 ऑगस्टला दिमाखदार पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी देशात कोरोना महामारीचे मोठे संकट आहे. या महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शेकाप पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार भाई जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही माणगावात दहा कार्यकर्ते एकत्रित येवून शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर ठेवून पक्षाचा 73 वा  वर्धापनदिन समारंभ कृषी उत्पन्न बाजार समिती माणगाव याठिकाणी साजरा केल्याचे तालुका शेकापचे चिटणीस रमेश मोरे यांनी सांगितले.

यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आंब्रे, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य नामदेव शिंदे, माणगाव तालुका सहचिटणीस राजेश कासारे, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य चंद्रकांत सत्वे, ज्येष्ठ कार्यकर्ते दामू बटावले, शामराव येलकर,कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य नरेश दळवी, कार्यकर्ते प्रमोद दळवी, मोनिश टेंबे, सुरेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी थोडक्यात प्रसार माध्यमांना माहिती देताना तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी सांगितले की, शेकाप हा गरीब शेतकर्‍यांचा पक्ष आहे. जिल्ह्यात शेकापने शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलने व मोर्चे काढले  आहेत. जिल्ह्यातील एक लढाऊ पक्ष म्हणून शेकापकडे पाहिले जाते.आमच्या पक्षाचा वर्धापनदिन दरवर्षी 2 ऑगस्टला मोठ्याप्रमाणात जिल्ह्यातील शेकापचे कार्यकर्ते एकत्रीत येऊन साजरा केला जातो. यावर्षी संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट असल्याने आ.भाई जयंत पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार माणगाव तालुक्यात गावांतून, ग्रामपंचायत कार्यालयातून शेकापचा वर्धापनदिन पाच, दहा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. तसेच माणगाव तालुक्याच्या ठिकाणी आम्ही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्व.प्रभाकर पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून लाल बावट्याला सलाम केल्याचे सांगितले.

अवश्य वाचा

फरमानशेठ दफेदार यांचे निधन