अलिबाग

रायगड जिल्ह्यात आज 528 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर अलिबाग तालुक्यात केवळ 47 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 43 हजार 606 रुग्णंसख्या झाली असून त्यापैकी 37 हजार 398 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात देखील  दिवसभरात 79 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर दुर्दैवाने अलिबाग तालुक्यामधील तीन रुग्णांसह जिल्हाभरात आल 23 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे मृत्यू झालेली रुग्णसंख्या 1 हजार 182 वर पोहचली आहे.

नवीन रुग्णांमध्ये पनवेम मनपा क्षेत्रामध्ये 264 पनवेल ग्रामीण 64, उरण 16, खालापूर 18, कर्जत 20, पेण 34, अलिबाग 47, मुरुड 1, माणगाव 21, रोहा 10, सुधागड 3, श्रीवर्धन 8, म्हसळा 1, महाड 15 तर पोलादपूर 6 असा समोवश आहे. तर 23 मृत रुग्णांमध्ये पनवेल ग्रामीण भागात 6 तर पनवेल मनपा क्षेत्रात 5, अलिबाग तालुक्यात 3, तसेच खालापूर, कर्जत, महाड या तीन तालुक्यात प्रत्येकी 2, पेण, श्रीवर्धन व पोलादपूर तालुक्यात येथे प्रत्येकी एक रुग्ण दगावले. शासनाने कोरोनामुक्त ठरवलेल्या 705 रुग्णांमध्ये पनवेल मनपा क्षेत्रातील 286, पनवेल ग्रामीण 89, उरण 17, खालापूर 16, कर्जत 21, पेण 31, अलिबाग 79, मुरुड 14, माणगाव 37, तळा 10, रोहा 57, सुधागड 10, श्रीवर्धन 2, महाड 18 तर पोलादपूर तालुक्यातील 18 रुग्णांचा समावेश आहे.

 आजपर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 159 वर पोहोचली आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी 96 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 3 हजार 612 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 451 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. 

अवश्य वाचा