अलिबाग  

रायगड जिल्ह्यात मंगळवारी आढळलेल्या 376 नवीन रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या 19 हजार 298 वर पोहोचली आहे. तर 8 जणांचा उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूमुळे मृतांची संख्या 524 वर गेली आहे. आज बरे वाटल्याने 291 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 15 हजार 335 झाली आहे. तर सद्यस्थितीत 3 हजार 439 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी लक्षणं नसलेले 2 हजार 185 गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. तर 269 रुग्ण डेडिकेटेड कोव्हिड 19 हॉस्पिटलमध्ये, 557 डेडिकेटेड कोव्हिड 19 हेल्थ सेंटरमध्ये तर 503 रुग्ण कोव्हिड 19 केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

नवीन आढळलेल्या 376 रुग्णांमध्ये पनवेल मनपा क्षेत्रात 179, पनवेल ग्रामीण 26, उरण 25, खालापूर 20, कर्जत 8, पेण 33, अलिबाग 41, मुरुड 2, माणगाव 9, रोहा 12, सुधागड 7, श्रीवर्धन 1, म्हसळा 2, महाड 8 व पोलादपूर 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरु असताना मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा क्षेत्रातील 4, पनवेल ग्रामीण मधील 1, खालापूर 1, महाड 1, पोलादपूर 1 अशा 8 जणांचा समावेश आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा क्षेत्रात 131, पनवेल ग्रामीण 42, उरण 17, खालापूर 27, कर्जत 8, पेण 7, अलिबाग 21, मुरुड 6, माणगाव 3, रोहा 24, म्हसळा 2, व पोलादपूर 3 अशा 291 रुग्णांचा समावेश आहे. 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही