अलिबाग 

रायगड जिल्ह्यात सुरू असलेली रुग्णवाढ थोपविणे शक्य झाले नसले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र समाधानकारक अशीच आहे. आतापर्यंत 18 हजार 922 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 15 हजार 46 रुग्ण बरे झाले आहेत. सरासरी नुसार 79.35 इतके हे समाधानकारक प्रमाण आहे. मात्र रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 2. 72 इतके आहे. हे प्रमाण मात्र गंभीर स्वरूपाचे असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील आरोग्यविषयक सुविधांवर जास्तीत जास्त भर देण्याची गरज आहे. सोमवारी  358 नवे रुग्ण आढळले असून आणि 365 कोरोनामुक्त झाले तर दुर्दैवाने 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा क्षेत्रात 169, पनवेल ग्रामीण 28, उरण 18, खालापूर 21, कर्जत 5, पेण 13, अलिबाग 14, मुरुड 2, माणगाव 3, तळा 2, रोहा 52, सुधागड  4, श्रीवर्धन 2, म्हसळा 3, महाड 19, पोलादपूर 3 अशा 358 जणांचा समावेश आहे. उपचार सुरू असलेल्यांपैकी पनवेल मनपा क्षेत्रातील 3, पनवेल ग्रामीण 2, उरण 3, खालापूर 1, पेण 1, अलिबाग 1, रोहा 1 अशा 12 जणांचा मृत्यू झाला. तर उपचारानंतर बरे होऊन कोरोना मुक्त झालेल्यांमध्ये पनवेल मनपा क्षेत्रातील 154, पनवेल ग्रामीण 31, उरण 2, खालापूर 30, कर्जत 9, पेण 48, अलिबाग 26, मुरुड 2, माणगाव 5,  रोहा 31,  श्रीवर्धन 2, म्हसळा 2, महाड 23 अशा 365 जणांचा समावेश आहे.

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद