अलिबाग 

अलिबाग तालुक्यातील कोरोना ग्रस्तांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नसून प्रशासन तसेच आरोग्य यंत्रणा  वाढती संख्या थोपविण्यास असमर्थ ठरत आहे. मंगळवारी तालुक्यात कोरोनाच्या 23 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे संसर्गित रुग्णांची संख्या 418 वर पोहोचली आहे. तर 39 रुग्ण उपचारानंतर  कोरोना मुक्त झाल्याने, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

बुधवारी आढळलेल्या 23 नव्या रुग्णांमध्ये बेलोशी, शहाबाज, कुरुळ, सागांव, बोडणी, पिंपळभाट, वरसोली, थेरोंडा आणि अलिबाग शहरातील बाजारपेठ, कोळीवाडा, रामनाथ परिसरातील रुग्णांचा समावेश आहे.

अलिबाग कोळीवाड्यात आज एक रुग्ण नोंदवला गेला आहे. येथील 51 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. तर शहरातीलच रामनाथमध्ये पोलीस लाईन गेटजवळ राहणार्‍या एका 49 वर्षीय व्यक्तीला कोरोनाने ग्रासले आहे. रामनाथ कुंभार आळी येथील 65 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर अलिबाग बाजारपेठ परिसरातील 40 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

बेलोशी येथे दोन रुग्णांची नोंद झाली आहे. येथील 28 वर्षीय तरुण आणि 60 वर्षीय महिला अशा दोघांना कोरोना झाला आहे. शहाबाजमध्ये चार रुग्ण आढळून आले आहेत. येथील 52 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा, 35 वर्षीय महिला आणि 12 वर्षीय मुलाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पोयनाड बस स्टँडजवळील प्रतिभा सोसायटीतील 34 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

बोडणी येथे आज 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत. येथील 40 वर्षीय व 29 वर्षीय महिला, 25 वर्षीय व 21 वर्षीय तरुण आणि एका 66 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कुरुळ-पठार येथील एका 62 वर्षीय व्यक्तीला, थेरोंडा येथील 29 वर्षीय तरुणाला, पिंपळभाट स्वामी समर्थ नगर येथील आनंद वन सोसायटीतील 50 वर्षीय व्यक्तीला तर बे ब्ल्यू वरसोली येथील 48 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

तालुक्यात आज 39 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामध्ये वेलवली 1, धेरंड 1, कुरुळ 1, कुसुंंबळे 1, सुडकोली 1, नवखार-सुडकोली 1, कुदे 3, रायवाडी-आक्षी येथील 2, इंद्रप्रस्थ सोसायटी गोंधळपाडा येथील 3, आदर्शनगर-कुरुळ येथील 2, आरसीएफ कॉलनी कुरुळ येथील 5, सुभाषनगर पोयनाड येथील 1, चोरगुंडी-पोयनाड येथील 6, मांडवखार नारंगी येथील 1, जिल्हा शासकीय रुग्णालय वसाहत अलिबाग 1, भालचंद्र छाया-विद्यानगर 1, वरसोली 2, कातळपाडा-सातिर्जे 1, सासवणे 1, मोठे शहापूर येथील 3, सहाणगोठी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, आजअखेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 418 वर पोहोचली आहे. यापैकी 199 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 209 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद