अलिबाग 

रायगड जिल्ह्यातीलकोराना रुग्णांची वाढती संख्या थांबायला तयार नाही.  आतापर्यंत कोरोना रुग्णसंख्येत 5 व्या सोमवारी आढळलेल्या 338 नवे रुग्ण, 8 जणांचा मृत्यू  तर 325 कोरोनामुक्त रुग्णानंतर रायगड जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 16 हजार 329 वर जाऊन पोहोचली आहे.

नव्याने आढळलेल्या 338 रुग्णांमध्ये पनवेल मनपा क्षेत्रात 166 तर पनवेल ग्रामीण 33, उरण 13, खालापूर 28, कर्जत 12, पेण 44, अलिबाग 33,   रोहा 19, तळा 3, , सुधागड 3, म्हसळा 4, महाड 27 तर पोलादपर 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. तर उपचार सुरु असलेल्यांपैकी पनवेल मनपा 2 तर पनवेल ग्रामीण, उरण, खालापूर , पेण,  अलिबाग, महाड प्रत्येकी एक अशा 8 जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला.

बरे झालेल्या रुग्णांमध्ये आज पनवेल मनपा क्षेत्रात 118, ग्रामीण 48,  उरण 9,  खालापूर 37, कर्जत 22, अलिबागच्या 21, तसेच पेण 37, माणगाव 18, रोहा 8, श्रीवर्धन 3, सुधागड 3,  म्हसळा 2, महाड 19 अशा एकूण 325 जणांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद