Wednesday, December 02, 2020 | 12:06 PM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

शिक्षकांच्या तपासणीत पनवेलचे 16 शिक्षक पॉझिटिव्ह
रायगड
21-Nov-2020 08:47 PM

रायगड

अलिबाग 

राज्यभरात मुंबई, ठाणे, पुणे वगळता स्थानिक प्रशासनाच्या जबाबदारीवर सर्व कडक नियम, निर्बंधांचे पालन करुन नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याच्या निर्णयानुसार रायगड जिल्ह्यातही पनवेल वगळता शक्य आहे तिथे सर्वच तालुकयांत शाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील 8 हजार शिक्षकांपैकी सुमारे 3 हजार शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या असून त्यात पनवेल मधील 16 शिक्षकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी बी एल थोरात यांनी दिली.

23 डिसेंबर पासून रायगडात नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात येणार असून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा मात्र बंद राहणार आहेत. मात्र जिल्ह्यातील इतर भागात जिथे शक्य असतील तिथे पुर्ण तयारीनिशी शाळा सुरु करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. शासनाचे सर्व निर्बंध, नियम कडक अंमलबजावणी करुन या शाळा सुरु करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कृषीवलजवळ दिली. पालकांची संमती यासाठी महत्वाची असल्याचेही त्या म्हणाल्या. पालकांना संमतीशिवाय शाळा सुरु होणा नसल्याचेही त्या म्हणाल्या. सर्व शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्ट झाल्यांनतरच या शाळा सुरु होतील. एाळा सुरु केल्यानंतर क्लोज मॉनिटीरींग केले जाईल. जिथे जिथे लक्षणे आढळतील अशा ठिकाणी तात्काळ निर्णय घेण्यात येणार असल्याचे ही जिल्हाधिकारींनी सांगितले.

जिल्हा शिक्षणाधिकारी बी एल थोरात यांनी सांगितले की 23 तारखेला शाळा सुरु करण्याच्या दृष्टीकोनातून सर्व तयारी सुरु असून काही शाळांचे चक्रीवादळात नुकसान झाले असून निधी अभावी त्यांच्या दुरुस्तीचे कामही रखडले असून त्या शाळा सुरु होण्याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. मात्र ज्या ज्या शाळा सुस्थितीत आहेत तिथे वर्ग सुरु करण्यात येतील. मात्र

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार आहेत. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना सदर निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आयुक्त देशमुख यांनी संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या आटोक्यात असला तरी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या काळात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. या दृष्टीने पुढील 4 ते 6 आठवडे खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री तटकरे यांनी आयुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे. 23 नोव्हेंबरपासून सुरु होणार्‍या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आता 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. नियमितपणे ऑनलाईन क्लासेस तसेच अन्य उपक्रम सुरु असणार आहेत. शालेय शिक्षण विभागाकडून 30 ऑक्टोबरनंतर शाळांमध्ये 50 टक्के शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच शिक्षकांनी शाळेत ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रम, विविध उपक्रम, पर्यायी शिक्षण या सर्व बाबींवर काम करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावी तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी यांच्या परीक्षा पुर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच सुरु राहतील.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top