आंबेत  

  म्हसळा तालुक्यात गेल्या 7 दिवसांत कोरोना विषाणू संसर्गाची साखळी वाढत चालल्याने तालुक्यातील जनता भयभीत झाली आहे.

 तालुक्यात नगरपंचायत हद्दीत चार दिवस आगोदर 7 रुग्ण तर गोंडघर येथील 1 अशा 8 रुग्ण कोरोना बाधीत सापडले होते पैकी गोंडघर येथील जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र साई येथे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याचे उपचार घेताना निधन झाले. म्हसळा तालुका शहरात नव्याने कोरोना बाधीत 16 रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझीटीव आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणेश कांबळे  यांनी दिली आहे.

 तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत चालल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.शहराचा विस्तार दाटीवाटीचा असल्याने आणि अनेकजण कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने कोरोना बाधितांचे संख्येतही अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तालुका शहरात आता कंटेंटमेंट झोनचा विस्तार वाढला आहे.

 म्हसळयात कोरोना बाधितांचा आकडा 58 इतका आहे.4 रुग्ण दगावले आहेत तर 30 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.अनेक दिवसांपासुन कोरोना मुक्त असलेला म्हसळा तालुक्याला कोरोनाचे ग्रहण लागल्याने स्थानिक प्रशासन खडबडुन जागे झाले आहे तर शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.आता सापडलेल्या बाधीत रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण नगरपंचायत हद्दीतील आणि ते गजबजलेल्या ठिकाणी वास्तव्यास असल्याने ग्रामस्थ फारच चिंतेत आहेत.

कोरोना बाबत म्हसळा आरोग्य प्रशासन हतबल झाला आहे.रुग्णांना कॉरोन्टाईन करण्यासाठी माणगाव,अलिबाग,पनवेल,पाली येथे रुग्णवाहिकेने नेण्यास, गाडी आणि चालक यांची कमतरता आहे.बाधीत रुग्णांचे नातलगांचे व त्यांचे संपर्कात आलेल्यांना स्वबचे टेस्ट करण्यास आरोग्य खात्याकडून फारच विलंब होत आहे.म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर,अधिकारी आणि कर्मचारी यांना स्वसंरक्षणासाठी किटची उपलब्धता नसल्याने आरोग्य यंत्रणाही धोक्याची घंटा मोजत आहे.रुग्णांमध्ये शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांचे  संख्येतही वाढ होत असल्याने तालुक्यातील आरोग्य सुविधे बाबत जिल्हा आरोग्य वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी वेळीच दखल घ्यावी अशी मागणी म्हसळयातील नागरिकांनी केली आहे.

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन