Monday, March 08, 2021 | 08:28 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

चौल भोवाळे परिसरात 13 कोंबड्या मृत
रायगड
20-Jan-2021 08:53 PM

रायगड

अलिबाग । विशेष प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील चौल भोवाळे परिसरात अचानक 13 कोंबड्या दगावल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी चार कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तपासणीच्या अहवालानंतरच या कोंबड्या ‘बर्ड फ्लू’ने दगावल्या की आणखी कशाने? हे निष्पन्न होणार आहे.

चौल भोवाळे परिसरात घरगुती कुक्कुटपालन करणार्‍या शेतकर्‍यांच्या कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. एकूण 13 गावठी कोंबड्या दगावल्याने येथील शेतकरी, ग्रामस्थ धास्तावले आहेत. याबाबत रायगड पशुसंवर्धन विभागाला कळविल्यानंतर, मृत कोंबड्यांपैकी चार कोंबड्यांचे नमुने मंगळवारी (20 जानेवारी) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. उद्या कोंबड्यांच्या तपासणीचे अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच या कोंबड्या कशामुळे दगावल्या, याचे कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, तालुक्यातील चौल-भोवाळे येथे दगावलेल्या कोंबड्या या बॉयलर नसून गावठी आहेत. त्यांच्या मृत्यूचे कारणही अद्याप अस्पष्ट आहे. मृत 13 कोंबड्यांपैकी 4 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. उद्या अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती रायगड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के यांनी दिली.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top