पनवेल 

   पनवेल शहर पोलीस ठाणे हददीतील टेक केअर लॉजीस्टिक, पळस्पे येथील पलक रेशन गोडावून येथे शासनाने कोवीड 19 या साथीच्या आजारामध्ये गोरगरीबांना पुरविण्यात येणारे रेशन धान्य गरजू पर्यत पोहोचविण्यासाठी तसेच वितरीत करण्यासाठी दिलेल्या रेशन मालाचा अवैधरित्या साठा करून काळयाबाजाराने विक्री केली जात असल्याची गोपनीय माहीती पनवेल शहर पोलिसांना मिळाल्यानंतर महसूल खात्याचे अधिकारी सोबत घेऊन 3 लाख 8 हजार रुपयांचा रेशन तांदळाचा साठा जप्त करण्यात आला तसेच तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

 नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, पोलीस सह आयुक्त राजकुमार व्हटकर, पोलीस उप आयुक्त अशोक दुधे यांनी यांनी  दिलेल्या सूचनेनुसार गुन्हयाची उकल करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश मिळाले. दिनांक 01/08/2020 रोजी पनवेल शहर पोलीस स्टेशन,नवी मुंबई यांनी 110 टन शासकिय रेशन तांदुळाचा काळयाबाजारातील साठा जप्त केला.   सदरचा माल दोन पंचासमक्ष हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये भेसळ माफिया म्हणून तिघांना तांब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये 1) भिमाशंकर रंगनाथ खाडे. 2) इकबाल काझी 3) लक्ष्मण चंद्र पटेल यांना रंगेहाथ अटक करून 3,08,000/- रूपये किंमतीचा रेशनिंग तांदुळाच्या प्रत्येकी 50 किलो वजनाच्या एकण 2220 गोण्या (सुमारे 110 टन) गोण्या व दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे  श्रहस्तगत करण्यात आले. यातील आरोपी भिमाशंकर रंगनाथ खाडे याच्यावर भोईवाडा पोलीस ठाणे येथे भा.द.वि.कलम 420, 406, 500 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

अवश्य वाचा