Monday, January 18, 2021 | 04:53 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

वेश्‍वी ग्रामपंचायतीमध्ये आघाडीला मतदारांचा पाठिंबा
रायगड
13-Jan-2021 08:01 PM

रायगड

। उरण । वार्ताहर ।

वेश्‍वी ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 15 जानेवारी रोजी होऊ घातली आहे.सध्या महाराष्ट्रामध्ये जी भाजपच्या विरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप अशी महाविकास आघाडी आहे. त्या धर्तीवर वेश्‍वी ग्रामपंचायत प्रभाग 2 व प्रभाग 3 मध्येसुद्धा भाजपच्या विरोधात शिवसेना-शेकाप-काँग्रेस-रा.काँग्रेस पक्ष एकत्र येऊन महविकास आघाडी निवडणूक लढवत आहे. या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

मात्र, प्रभाग 1 मध्ये ग्रामविकास आघाडी होऊन वॉर्ड क्र.1 मधून ज्योत्स्ना संदीप पाटील, निकीता आकाश खेरे, संदीप गणपत कातकरी हे ग्रामविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून ग्रामविकास आघाडीने आपले खाते खोलले आहे.यामध्ये महाविकास आघाडीतर्फे प्रभाग 2 मधून महाविकास आघाडीमधून अविष्कार अनंत पाटील, परेश धर्मराज पाटील, वनिता प्रवीण पाटील. प्रभाग 3 मधून वैभव पांडुरंग पालकर, नीलम दत्ता मुंबईकर, जयश्री एकनाथ पाटील हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बुधवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने काढलेल्या महाविकास आघाडीच्या रॅलीस मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.  

या रॅलीत महविकास आघाडीतर्फे सरपंच नरेंद्र मुंबईकर, मा. सरपंच नामदेव पाटील, शिक्षक नेते बाबुराव पालकर, शिवसेना तालुका संघटक बी.एन. डाकी, उपतालुकाप्रमुख प्रदीप ठाकूर, शिवसेना महिला ता. संघटक भावना म्हात्रे, विभाग प्रमुख संदेश पाटील, शिवसेना शाखाप्रमुख रवींद्र पाटील, मा. शाखा प्रमुख अरविंद पाटील, वैजनाथ मुंबईकर, चंद्रकांत मुंबईकर, प्रमोद आ. मुंबईकर, प्रकाश मुंबईकर, अमृत पाटील, महेंद्र मुंबईकर, देविदास मुंबईकर,सुरेश कडू,राजू मुंबईकर,अ‍ॅड. संतोष पाटील,जयेंद्र पाटील, विंधणे शाखाप्रमुख शशी पाटील आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top