Wednesday, May 19, 2021 | 02:57 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

शेकाप नेते आर.डी.घरत यांचे निधन
रायगड
03-May-2021 07:35 PM

रायगड

 

| पनवेल | वार्ताहर  |

पनवेल तालुका शेकापचे ज्येष्ठ नेते काळुंद्रेचे माजी सरपंच आणि शेकापचे विद्यमान प्रवक्ते आर.डी.घरत यांचे  शनिवारी( 1 मे)  हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कणखर आवाज करीत सभा असोत अथवा मोर्चा असो, याठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची  बाजू समोर आणणारे आणि बेधडक विचार मांडणारे असे नेते म्हणजे आर.डी.घरत यांचे नाव घेतले जायचे. एकेकाळी काँग्रेस पक्षातून शेतकरी कामगार पक्षात आलेले आर.डी. पक्षाशी शेवटच्या श्‍वासापर्यंत एकनिष्ठ राहिले. ओएनजीसी येथील शाळेविरोधात आमरण उपोषण करून शाळा प्रशासनाला त्यांची जागा दाखविणारे, काळुंद्रे येथील नालेसफाई करीत असताना तिघांच्या मृत्यूला महापालिकेला जबाबदार धरणारे, प्रकल्पग्रस्त आणि शेतकर्‍यांसाठी सतत झटणारे असे नेते आर.डी.घरत यांच्यावर काळाने झडप घातली. आर.डी.घरत यांच्या जाण्याने पनवेलसह परिसरातील शेतकरी कामगार पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काळुंद्रे येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर नेत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top