Monday, March 08, 2021 | 08:23 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पोलीस संघटनेच्या उपोषणाला सरकारी अधिकार्‍यांचा खो
रायगड
20-Jan-2021 07:13 PM

रायगड

। नेरळ । वार्ताहर । 

कर्जत टिळक चौकात पोलीस मित्र संघटना तलाठीच्या कारभाराबाबत उपोषणाला सोमवारी बसली. मात्र,तीन दिवस होत आले अद्यापपर्यंत कोणतेच अधिकारी फिरकले नाही. यामागचे कारण अस्पष्ट असल्याने नागरिकांमध्ये प्रश्‍न निर्माण होत आहे.थोडक्यात, अधिकारी वर्ग फक्त मोठ मोठ्या उपोषण, आंदोलन ठिकाणी भेटी देतात, मात्र सर्वसामान्यांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली जाते. संबंतिध प्रशासनाकडून होत असलेल्या भेदभावबद्दल उपोषणकर्ते कोकण विभागाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी खंत व्यक्त केली. 

आतापर्यंत जेवढे प्रशासकीय अधिकारी नवीन आले आहेत, तसेच उपोषणाचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत किरवली ग्रामपंचायतीचे सदस्य हिरामण गायकवाड यांनीही तहसीलदारांना पत्रव्यवहार करून कळविले होते. मात्र, फक्त आश्‍वासन देऊन उपोषण थांबविले जाते. पण, आश्‍वासनाची पूर्तता केली जात नाही. तेदेखील शनिवारी पुन्हा तहसील कार्यालयात उपोषणाला बसणार आहे. त्यांनतर 7 डिसेंबर 2020 रोजी तलाठी यांच्या गैरकारभारबाबत पोलीस मित्र संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष रमेश कदम आणि माजी जिल्हा उपाध्यक्ष दशरथ मुने उपोषणाला बसले होते. 9 डिसेंबरला नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते पंधरा दिवसात चौकशी करण्याचे लेखी पत्र देऊन संबंधितांची चौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. तरी, महिना ओलांडून गेला तरीदेखील आश्‍वासन फक्त कागदोपत्री झाले. त्याचे निराकरण न झाल्याने पुन्हा सोमवारपासून पोलीस मित्र संघटनेने टिळक चौकात उपोषण छेडले असून, अद्यापपर्यंत कोणताच अधिकारी फिरकला नाही. यामागचे कारण काय? असा प्रश्‍न सर्व सामान्य नागरिकांना पडत आहे.    

  शासकीय अधिकार्‍यांच्या गलथान कारभाराविरोधात घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला आहे. याप्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी, जिल्हा निरीक्षक हनुमंत ओव्हाळ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील,प्रभारी हरेश काळे, ठाणे जिल्हाध्यक्षा नीरजा अंबेरकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वनिता जाधव, साईनाथ मुने, एकनाथ कोळंबे, किरण पोस्टेकर, भास्कर मुने आदी पदाधिकारी उपस्थित होते.   

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top