ताडवागळे 

पनवेल तालुक्यातील कळंबोली येथे सापडलेल्या एका वयोवृध्द मनोरुग्ण महिलेला उपचारासाठी ठाणे येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळंबोली पोलिस तसेच महिला बाल विकास विभाग, सखी केंद्र व विधी सेवा प्राधिकारण रायगड यांच्या प्रयत्नातून या महिलेला ही मदत मिळाली आहे.

कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक बेवारस वृद्ध महिला रस्त्यावर दिसून आली. पनवेल परिसरातील काही सामाजिक कार्यकर्तांनी तिला कळंबोली पोलिस ठाणे तसेच संरक्षण अधिकारी पनवेल यांच्या निदर्शनास आणून दिली. सदर महिला साधारण 55 ते 60 या वयोगटातील असल्यामुळे तसेच त्यांच्यावर मानसिक तणाव चेह-यावर दिसून आला, सदरच्या महिलेला उपचाराकरिता एमजीएम हॉस्पीटल, कामोठे येथे दाखल करण्यात आले.

परंतु उपचार करत असताना सदरची महिला रूग्णालयातील इतर रूग्णांना त्रस्त करू लागली. तसेच उपचारासाठी प्रतिसाद देत नसल्यामुळे मानसिक संतुलन बिघडल्यान ेसदरच्या महिलेस मानस उपचार तज्ञांच्याव्दारे उपाचार घेणे गरजेचे होते, त्याकरीता तात्काळ कळंबोली पोलिस ठाण्याच्या पोलिस कॉन्स्ट्रेबल प्रिती माने तसेच सहा. संरक्षण अधिकारी पनवेल येथील कैलास सर यांनी संकटग्रस्त व अत्याचारग्रस्त महिलांना मदत करणा-या  रायगडच्या सखी केंद्रात ससंपर्क केला. तसेच त्यानंतर सखी केंद्राच्या तसेच भरोसा सेल रायगड पोलिसच्या विधी व न्याय सल्लागार अ‍ॅड. गिता दर्शन म्हात्रे व विधी सेवा प्राधिकारण रायगडच्या पॅनल अ‍ॅड. शिल्पा पाटील यांनी सदरच्या महिलेस तात्काळ प्रभारीमुख्य न्याय दंडाधिकारी रायगड-अलिबाग यांच्या समोर हजर करून त्यांची मानसउपचारतज्ञ जिल्हा शासकीय रूग्णालय अलिबाग यांच्याकडे तपासणी करिता परवानगी घेतली.

 त्याठीकाणी तपासणी करून त्यानंतर पुन्हा त्यामहिलेस   न्यायालयासमोर हजर करून भारतीय मनोरूग्णसंबंधिचा अधिनियम 1912 अन्वये मनोरूग्ण अनोळखी महिला यांची तपासणी केल्यानंतर  न्यायाधिशांनी पुढील उपचारासाठी मनोरूग्णालय ठाणे येथे दाखल करण्याच ेनिर्देश दिले. त्यानंतर तिला तात्काळ त्याच वेळी ठाणे येथेनेऊन पुढील अत्यावश्यक उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त