खांब-रोहे 

रोहा कोलाड मार्गावर मोठ्या प्रमाणावर मोकाट गुरांचा उपद्रव वाढला असल्याने वाहनचांलकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.

रोहे-कोलाड या 11 किमी लांबीच्या मार्गावर ठिकठिकाणी मोकाट गुरांचे कळप आढळून येतात. कधी रस्त्याच्या दुतर्फा तर कधी रस्त्याच्या मधोमध चालणारी ही गुरे वाहतूकीस अडथळा ठरून वाहतूक कोंडीचे कारणही ठरत आहेत.तर कधी कधी भरधाव धावणार्‍या वाहनांच्या एकाकी मधोमध येऊन अपघात घडविताना दिसत आहे.अशावेळी गुरांना इजा तर पोहोचते याशिवाय वाहनचाकांच्या  वाहनांचे नुकसान होऊन वाहनचालकही जखमी होण्याचे प्रसंग यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधित विभागाकडून कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.