अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
वरुण धवनच्या लग्नाच्या सप्तपदीची वेळ आली आहे. आज तो त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. वरुण आणि नताशा अलिबागमध्ये सासवणे येथील मेन्शन हाऊस येथे लग्न करीत आहेत. विशेष म्हणजे कालच प्रसिद्ध आर्टिस्ट वीणा नागडा यांनी नवरी नताशाच्या हातावर मेहंदी काढली. तर आज प्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्रा, दिग्दर्शक करण जोहर व कुणाल कोहली यांनी लग्नाच्या ठिकाणी हजेरी लावली.