। चिरनेर । वार्ताहर ।
श्री. दत्ता भोईर व उरणकर मंडळी प्रस्तुत आगरी-कोळी भाषेतील पहिले संगित महानाट्य या गो दांडयावरनं हा आगरी-कोळी बोली भाषेतील नजराणा रसिकांच्या भेटीला येत असून, या संगितमय महानाटयाच्या पहिल्या प्रयोगाचे उद्घाटन रविवारी (दि.14) पनवेल येथील वासूदेव बळवंत फडके या नाटयगृहात सायंकाळी 4 वाजता माजी खा.संजीवजी नाईक, आ.रमेशदादा पाटील, आगरी समाजाचे नेते जयेंद्रबाबा खुणे, आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. या महानाटयाचे लेखन व संकल्पना कलासक्त् कलायात्री दत्ता भोईर यांची आहे. तर दिग्दर्शन शैलेश फणसगावकर यांचे आहे. आगरी बोलीच्या वैशिष्टयपूर्ण संवादातून होणारी निखळ विनोद निर्मिती ही रसिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.