Friday, March 05, 2021 | 06:31 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

अलिबागमध्ये रंगणार संगीत महोत्सव
16-Feb-2021 05:26 PM

अलिबाग । प्रतिनिधी ।

मैफिल, अलिबाग या संस्थेतर्फे येथील आरसीएफ वसाहतीमध्ये दि. 20-21 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जगप्रसिद्ध सतारवादक निलाद्रीकुमार यांचे सतार वादन, युवा गायिका श्रुती बुजरबरुआ हिचे शास्त्रीय गायन आणि सुविख्यात हार्मोनियम वादक व संगीतकार निरंजन लेले प्रस्तुत संगीत कॅलिडोस्कोप हा फ्यूजन अशी भरगच्च सांगीतिक मेजवानी आहे.

अलिबागसह रोहा, पेण, मुरुड, रेवदंडा तालुक्यापर्यन्त सभासद वर्गाचे क्षेत्र पसरलेली ही संस्था गेली तीस वर्षे सातत्याने  अभिजात संगीताचे कार्यक्रम आयोजित करीत आहे.

यावर्षी संस्थेचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रशांत घाटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ङ्गडॉ.प्रशांत घाटे स्मृती संगीत महोत्सवफ आयोजित करण्यात आला आहे. मैफिलच्या परंपरे नुसार उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना महोत्सवात गायची संधी दिली जाते. या वर्षी ही संधी लाभलेली आहे मूळची आसामची असलेली प्रतिभाशाली उदयोन्मुख गायिका श्रुती बुजरबरुआ हिला.

आई वडील दोघेही गायन क्षेत्रात असलेल्या श्रुतीने पुण्यातीलसुप्रसिद्ध गायक पं. विजय कोपरकर यांच्याकडे शास्त्रीय गायनाची तालिम घेतली आहे. संगीत विशारद,संगीत निपुण आणि एस.एन.डी. टी. मधून संगीत विषयात एम.ए अशा अनेक पदव्या तिने प्राप्त केल्याअसून सध्या ती ठाण्यात प्रसिद्ध गायिका प्रतिमा टिळक यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहे.

दि.20 फेब्रुवारीचे दुसरे कलाकार आहेत प्रसिद्ध सतार वादक निलाद्रीकुमार. पं रविशंकरांचे शिष्य कार्तिक कुमार यांचे निलाद्रीकुमार हे चिरंजीव आहेत. त्यामुळे सतारीचा भक्कम वारसा निलाद्री कुमारांना घरातूनच मिळाला आहे. त्यांनी सतार आणि गिटार या वाद्यांमधून झिटार हे नवीन वाद्य निर्माण केलं आहे. निलाद्रीकुमार झिटारच्या माध्यमातून नव्या पिढीला भावणार्‍या फ्युजन सारख्या प्रकारात तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहे.

बॉलीवूडमधल्या अनेक गाण्यांसाठी त्यांनी वादन केले आहे. या कार्यक्रमात त्यांना सुविख्यात तबलजी सत्यजित तळवलकर यांची साथ लाभणार आहे. तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि विदुषी पद्मा तळवलकर यांचे सुपुत्र सत्यजीत हे जगद्विख्यात तबलजी म्हणून नावारूपास येत आहेत.

दि 21 फेब्रुवारी संगीत कॅलिडोस्कोप हा एक आगळा वेगळा कार्यक्रम सादर होणार आहे.प्रसिद्ध हार्मोनियम वादक निरंजन लेले यांच्या संकल्पनेतील या अभिनव कार्यक्रमात संपदा माने, ओंकार प्रभूघाटे, कृष्णा बोंगाणे या गुणी गायकांसह प्रसाद पाध्ये, प्रशांत लळीत, प्रभाकर कोसमकर अशी बिनीची वादक मंडळी नाट्यगीतांवर फ्युजनच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहेत. या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे याचं निवेदन करणार आहेत प्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक.

कार्यक्रमचा आस्वाद घेऊ इछिणार्‍या संगीत रसिकांनी उदय जोशी 9921924500 किंवा उदय शेवडे 9987768748 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top