अलिबाग
अलिबाग चा निसर्ग नेहमीच मायानगरीला साद घालत असतो. आजवर अनेक सिनेमांचे चित्रीकरण परिसरात करण्यात आले आहे. लॉकडाउनमुळे रखरखीत आयुष्याला कंटाळलेल्या अलिबागकरांना नवीन सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून बॉलीवूडची आघाडीची नायीका दिपीका पादुकोण या सिनेमात असल्याने तिच्या दर्शनाने अलिबागकर सुखावले आहेत.
तालुक्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांवर टिव्ही सिरिअल आणि चित्रपटांचे चित्रीकरण सुरु आहे. आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोनचे सध्या मुंबई-अलिबाग असे अप-डाऊन सुरु आहे.
शकुन बत्रा यांच्या नाव निश्चित न झालेल्या एका हिंदी चित्रपटाची अलिबाग परिसरात शुटींग सुरु आहे. ती, सिध्दार्थ चतुर्वेदी आणि अनन्या पांडे या चित्रपटात काम करत आहेत. दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंग तिला गेटवेला सोडण्यासाठी येतो. मग ती, सिध्दार्थ चतुर्वेदी अवघ्या वीस मिनिटांत मांडवा येथे पोहचतात आणि मग तेथून गाडीने शुटींग स्पॉटवर जातात.
यासोबतच एक हिंदी सिरिअल आणि ‘जुगाड्या’ मराठी चित्रपटाचे शुटींगही अलिबागमध्ये सुरु आहे. एकंदरीत अलिबागमध्ये सध्या शुटींगचे वारे वाहत आहेत.